पीएफआयच्या रॅलीत दंगल, एक ठार
By Admin | Updated: February 21, 2015 00:49 IST2015-02-21T00:49:42+5:302015-02-21T00:49:42+5:30
शिवामोगा : कर्नाटकच्या शिवामोगा येथे गुरुवारी पाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) ने आयोजित केलेल्या रॅलीदरम्यान उसळलेल्या दंगलीत एक जण ठार आणि दोन जखमी झाले.

पीएफआयच्या रॅलीत दंगल, एक ठार
श वामोगा : कर्नाटकच्या शिवामोगा येथे गुरुवारी पाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) ने आयोजित केलेल्या रॅलीदरम्यान उसळलेल्या दंगलीत एक जण ठार आणि दोन जखमी झाले.या हिंसाचारानंतर शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या रॅलीत भाग घेण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी उभ्या केलेल्या वाहनांवर दगडफेक करण्यात आल्यानंतर हा हिंसाचार उफाळला. दगडफेक करणाऱ्या लोकांनी थेट रॅलीत घुसून कार्यकर्त्यांना मारहाण केली. या दरम्यान दोन्ही गटांचे लोक आपसात भिडले आणि संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतर गजनूर येथे गुरुवारी रात्री एका इसमावर शस्त्रानिशी हल्ला करण्यात आला. यात हा इसम मारला गेला तर दोन जण जखमी झाले.