२५१ रुपयातल्या मोबाईलनंतर रिंगींग बेलचा आता एलईडी टीव्ही
By Admin | Updated: August 12, 2016 17:11 IST2016-08-12T17:11:50+5:302016-08-12T17:11:50+5:30
सर्वसामान्यांना परवडणारा २५१ रुपयातील 'फ्रिडम २५१' हा स्मार्ट फोन बनवणा-या रिंगीग बेल कंपनीने आता एचडी एलईडी टीव्हीच्या निर्मितीची घोषणा केली आहे.

२५१ रुपयातल्या मोबाईलनंतर रिंगींग बेलचा आता एलईडी टीव्ही
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - सर्वसामान्यांना परवडणारा २५१ रुपयातील 'फ्रिडम २५१' हा स्मार्ट फोन बनवणा-या रिंगीग बेल कंपनीने आता एचडी एलईडी टीव्हीच्या निर्मितीची घोषणा केली आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनापासून एलईडी टीव्हीची ऑनलाइन बुकिंग स्वीकारणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
रिंगीग बेलने ३१.५ इंचाच्या एलईडी टीव्हीसाठी ९,९०० रुपये किंमत निश्चित केली आहे. यापूर्वी 'फ्रिडम २५१' मोबाईलच्या डिलिव्हरीला विलंब झाला होता. ठरलेल्या वेळात मोबाईल ग्राहकांपर्यंत पोहोचवता आला नव्हता. एलईडी टीव्हींची दुस-या दिवसापासूनच १६ ऑगस्टपासून डिलिव्हरी सुरु करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
आदल्या दिवशी ऑर्डर स्वीकारल्यानंतर लगेच दुस-या दिवशी डिलिव्हरी कशी पोहोचवणार एकूणच या प्रक्रियेबाबत अस्पष्टता आहे. फक्त एका दिवसासाठी ही सुविधा असून, रिंगीग बेलच्या संकेतस्थळावरुन बुकिंग करावे लागेल. कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे एलईडी टीव्ही मिळाल्यानंतर कॅश द्यावी लागेल. सध्या ऑनलाइन पोर्टलवर चांगल्या ब्राण्डच्या ३१.५ इंच एलईडी टीव्हीची किंमत १३ ते १७ हजार दरम्यान आहे.