शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घराणेशाहीवरून मोदींनी दिला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना कठोर संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 05:35 IST

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्याच्या प्रक्रियेचा भाग असलेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना घराणेशाहीवरून कठोर संदेश देते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवारवादाला प्रोत्साहन देण्याच्या वाढत्या प्रवृत्तीला तीव्र विरोध केला.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्याच्या प्रक्रियेचा भाग असलेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना घराणेशाहीवरून कठोर संदेश देते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवारवादाला प्रोत्साहन देण्याच्या वाढत्या प्रवृत्तीला तीव्र विरोध केला.शुक्रवारी रात्री भाजपाच्या मुख्यालयात मध्य प्रदेशातील लोकसभेच्या २९ जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी मध्य प्रदेशातील वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीतच मोदी यांनी परिवारवादाला प्रोत्साहन देण्याच्या प्रवृत्तीवरून खडसावले. या बैठकीत कैलाश विजयवर्गीय यांचा थेट उल्लेख करून ते म्हणाले की, तुम्ही मुलाच्या उमेदवारीसाठी कसे डाव खेळलात, हे मी विसरू शकत नाही. तुमच्या या कृतीने मी कमालीचा नाराज आहे, असे खडे बोल सुनावले.मोदी यांच्या परखड बोलाने भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत शांतता पसरली. या बैठकीला भाजपा अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, जे. पी. नड्डा, शिवराज सिंह चौहान, गोपाल भार्गव आणि मध्य प्रदेशातील भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.मध्य प्रदेशातील आपली विधानसभेची जागा आपल्या मुलासाठी कैलाश विजयवर्गीय यांनी सोडल्याचा विषय तसा जुनाच आहे. त्यांच्या मुलाला विधानसभेचे तिकीट देण्यात आले होते आणि ते विजयीही झाले; परंतु लोकसभेसाठी उमेदवार निवडण्यासाठी मध्य प्रदेशातील भाजपाचे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी हा चार महिन्यांपूर्वीचा मुद्दा उपस्थित करून घराणेशाहीला तीव्र विरोध केला.शिवराज सिंह चौहान हेही आपल्या पत्नीला विदिशाची उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही असल्याचे समजल्यानंतर पंतप्रधान मोदी नाराज झाले.एकदाचा अध्याय बंदविजयवर्गीय हे पक्षश्रेष्ठींचे निकटवर्ती मानले जातात. इंदूर लोकसभेच्या जागेसाठी आपणास उमेदवारी द्यावी, अशी त्यांची इच्छा होती. सुमित्रा महाजन यांनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडली असल्याने या जागेसाठी आपण स्वत: इच्छुक आहोत, असा त्यांनी भरबैठकीत या जागेवार स्वत:चा दावा केला होता. तथापि, पंतप्रधानांनी परिवारवादावर उघड नाराजी व्यक्त करून विजयवर्गीय यांचा अध्यायच बंद करून टाकला. कुटुंबातील सदस्य वा नातेवाइकांच्या उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या अन्य नेत्यांचीही स्वप्नेही धुळीस मिळाली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक