दारुबंदीचा निर्णय योग्य
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:13+5:302015-01-23T23:06:13+5:30
दारूबंदीचा निर्णय योग्यच

दारुबंदीचा निर्णय योग्य
द रूबंदीचा निर्णय योग्यच अनेक वर्षाँपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूमुळे हजारो संसार उद्ध्वस्तझाले होते . विशेष म्हणजे दारूबंदीसाठी चंद्रपूरमध्ये वारंवार आंदोलनेहीझालीत. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्ह्यात दारूबंदीसाठी विशेषआग्रही होते. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रपुरात त्यांनी यासंदर्भातआश्वासन दिले होते. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा राज्यशासनाचा निर्णय हा अतिशय योग्य असून, त्याचे स्वागत आहे परंतु राज्यात चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांच्यासीमेलगत अवैध दारू निर्मिती आणि हातभट्टय़ा दारूबंदीमुळे सुरू होण्याचीशक्यता आहे. त्यावर आळा घालण्यासाठी शासनाच्या उपाययोजना ह्याप्रभावशाली असणे आवश्यक आहे. दारूबंदीनंतर जिल्ह्यात दारू विकणाऱ्यांवरकडक कारवाई होणे आवश्यक आहे या निर्णयाची अंमलबजावणी कठोरपणे होणेआवश्यक आहे तरच दारूविक्रीवर नियंत्रण येऊ शकेल .प्रा मधुकर चुटेनागपूर.