येवल्यात रिक्षा चालक तरु णाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2016 03:05 IST2016-10-10T00:27:04+5:302016-10-10T03:05:35+5:30

येवल्यात रिक्षा चालक तरु णाची आत्महत्या
येवला : येथील गंगादरवाजा परिसरातील रिक्षा चालक रंगनाथ शामराव पवार (३५) याने राहत्या घरी स्कार्फच्या सहाय्याने घराच्या छताला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुले व पत्नी शेजारी टी. व्ही. पाहण्या साठी गेले असता रंगनाथ याने गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याच्या पश्चात आई, वडील,पत्नी तीन मूली, १ मुलगा असा परिवार आहे .रंगनाथ याचे पार्थिवाचे ग्रामीण रु ग्णालयात शवविश्चेदन करून रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्युची नोंद केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय पाटिल यांच्या मार्गदर्शना खाली ए. एस. बारहाते करीत आहेत. (वार्ताहर)