तांदूळप्रकरणी शिवसेना शाळेवर मोर्चा नेणार
By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:50+5:302015-07-10T21:26:50+5:30
श्रीरामपूर : हिंदसेवा मंडळाच्या श्रीरामपूरमधील के. जे.सोमैय्या शाळेतील तांदूळ गैरव्यवहारप्रकरणी मुख्याध्यापकासह शाळा समितीच्या पदाधिकार्यांवर कारवाई न झाल्यास शाळेवर मोर्चा नेऊन आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडदे यांनी दिला आहे.

तांदूळप्रकरणी शिवसेना शाळेवर मोर्चा नेणार
श रीरामपूर : हिंदसेवा मंडळाच्या श्रीरामपूरमधील के. जे.सोमैय्या शाळेतील तांदूळ गैरव्यवहारप्रकरणी मुख्याध्यापकासह शाळा समितीच्या पदाधिकार्यांवर कारवाई न झाल्यास शाळेवर मोर्चा नेऊन आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडदे यांनी दिला आहे.एक वर्षापूर्वीच शिवसेनेने यासंदर्भात चालणारे रॅकेट उघड करून सर्व पुरावे गटविकास अधिकारी व केंद्रप्रमुखांकडे दिले होते. पण तेव्हा त्याची दखल घेण्यात आली नाही. सोमैय्यातील प्रकरणात शाळेतील तांदूळ काळ्याबाजारात नेताना पकडून पोलिसांनी चार जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले. याबाबत मुख्याध्यापक, शाळा समितीचे पदाधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करून शालेय पोषण आहारातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी दोन वर्षांचे रेकॉर्ड तपासून त्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी बडदे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)