मध्य प्रदेशमधीलकाँग्रेसच्या एका कार्यक्रमात भोजनावरून झालेल्या गोंधळाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कार्यक्रम संपल्यानंतर तिथे असलेल्या भोजनाचा लाभ घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. मात्र या जेवणावळीदरम्यान, ऐनवेळी भात संपल्याने वैतागलेल्या कार्यकर्त्यांनी तिथे असलेल्या भाजीवरच ताव मारला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
हे व्हिडीओ नॅशनल महामार्ग क्रमांक ४४ वर स्थित असलेल्या बॅक्वेट हॉलमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे आज दुपारी २ वाजता एसआयआरच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रभारी हरिश चौधरी आणि सह प्रभारी आणि राजस्थानमधील भरतपूर येथील काँग्रेसच्या खासदार संजना जाटव उपस्थित राहिल्या.
कार्यक्रम संपून नेतेमंडळी गेल्यानंतर कार्यकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र जेवणावळीला सुरुवात होताच कार्यकर्ते भोजनावर तुटून पडले. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कार्यकर्ते मिळेल त्यावर ताव मारला. कुणी भाजी, तर कुणी बुंदी पळवली. अनेक जणांपर्यंत जेवणाचं पूर्ण ताटच पोहोचलं नाही. मात्र जेवणाची लुटालूट सुरूच होती. कुणाचे कपडे खराब होत होते. मात्र असं असतानाही जेवणासाठी उडालेली झुंबड थांबत नव्हती. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ काँग्रेसच्याच एका कार्यकर्त्याने रेकॉर्ड केला आणि तो नंतर व्हायरल झाला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश सिंघी यांनी सांगितले की, अशी कुठली घटना माझ्या निदर्शनास आलेली नाही. कार्यक्रमासाठी भोजन मुबलक प्रमाणात बनवण्यात आलं होतं. जर व्हिडीओ समोर आला असेल तर, तो व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीचे ना सांगा. दरम्यान, या प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे. तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते बेशिस्त असल्याची टीका भाजपाने केली आहे.
Web Summary : A video shows Congress workers in Madhya Pradesh scrambling for food after a rice shortage. The incident occurred after a meeting, leading to chaos and accusations of indiscipline from the BJP. Investigation is ongoing.
Web Summary : मध्य प्रदेश में कांग्रेस कार्यकर्ताओं ने चावल की कमी के बाद भोजन के लिए हंगामा किया। बैठक के बाद हुई इस घटना में बीजेपी ने अनुशासनहीनता का आरोप लगाया है। जांच जारी है।