तांदळाच्या भावात वाढ
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:33+5:302015-08-26T23:32:33+5:30
पुणे :पुढील हंगामात तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने आत्तापासूनच घाऊक बाजारात येणार्या तांदळाच्या भावात वाढ होवू लागली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात तांदळाच्या भावात प्रति क्लिंटल ३०० ते ५०० रुपयांनी झाली. यापुढेही काही प्रमाणात ही वाढ होत राहण्याची शक्यता आहे, असे तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले.

तांदळाच्या भावात वाढ
प णे :पुढील हंगामात तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने आत्तापासूनच घाऊक बाजारात येणार्या तांदळाच्या भावात वाढ होवू लागली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात तांदळाच्या भावात प्रति क्लिंटल ३०० ते ५०० रुपयांनी झाली. यापुढेही काही प्रमाणात ही वाढ होत राहण्याची शक्यता आहे, असे तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले.मागील वर्षीपासून नैसर्गिक आपत्तीचा फटका तांदळाच्या उत्पादनावर झाला आहे. सध्याही पावसाने पाठ फिरविल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मावळ आणि भोर तालुक्यातील भात शेतीचे प्रमाणही कमी झाले आहेत. जे शेतकरी भात शेती करतात ते प्रामुख्याने आंबेमोहर आणि इंद्रायणी जातीच्या तांदळाचे उत्पादन घेतात. त्यामुळे हा भात स्थानिक पातळीवरच जास्त प्रमाणात विक्री होतो. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि इतर राज्यांमध्येही पावसाने ओढ दिल्याने तेथे भाताचे पीक पावसाअभावी जळुन जात आहे. त्याचा परिणाम म्हणजे तांदळाचे उत्पादन घटले असून शिल्लक असलेला साठ्याचाही तुटवडा जाणवत आहे. मध्यप्रदेशातून येणार्या तांदळाला कर्नाटक येथून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. परिणामी मध्यप्रदेश येथील तांदुळ कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणावर जात असल्याने पुण्याच्या बाजारामध्ये तुटवडा जाणवू लागला आहे. शहा म्हणाले, मध्यप्रदेश सीमेवरुन येणार्या कोलम तांदळाच्या भावात क्विंटलमागे ४०० रुपये, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्यप्रदेश येथून येणार्या कोलमच्या भावात ३०० ते ५०० रुपये तर सोना मसुरीमध्ये ५०० ते ६०० रुपये भाववाढ झाली आहे. ही भाववाढ कमी होण्यासाठी सप्टेबर महिन्यात पाऊस होणे आवश्यक आहे. पाऊस झाल्यास तांदळाचे भाव खाली येण्यास मदत होईल. मात्र, अपेक्षित पाऊस न झाल्यास आणखी भाववाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बासमीत तांदळाचे भावही वाढतील. तांदूळाचे भाव पुढीलप्रमाणे : उकडा २८००-३०००, मसुरी २६००-२८००, सोनामसूरी ३०००-३३००, लचकरी कोलम ४२००-४७००, कोलम ३८००-४०००, चिन्नोर ३२००-३५००, ११२१ - ६५००-७५००, आंबेमोहोर (सुवासिक) ४६००-५४००, बासमती अखंड ८५००-९०००, बासमती दुबार ६०००-६५००, बासमती तिबार ७०००-७५००, बासमती मोगरा ३३००-३६००, बासमती कणी २३००-२५००, सरबती ४०००-४५००, सेला बासमती ५०००-६०००.---------