शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

"पोलीस आम्हाला लपवा म्हणत होते"; नर्सने सांगितला हॉस्पिटलमधील अंगावर काटा आणणारा प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 16:45 IST

कोलकाता येथे डॉक्टरच्या हत्या आणि बलात्कार प्रकरणाचा निषेध नोंदवला जात असताना काही अज्ञातांनी रुग्णालयाची तोडफोड केली.

Kolkata Hospital Mob Horror : कोलकात्याच्या आरजी कार रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टर संजय रॉयला अटक केली आहे. या घटनेचा देशभरात निषेध नोंदवला जात आहे. मात्र बुधवारी रात्री या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं. रात्री उशिरा अज्ञातांनी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची तोडफोड केली.  प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ मध्यरात्री ही तोडफोड झाल्याचे म्हटलं जात आहे. पोलिसांनी फेसबुकवर दंगलखोरांचा फोटो शेअर केली आहेत आणि त्यांच्याबद्दल लोकांकडून माहिती मागवली आहे. दुसरीकडे, तोडफोड करणारे एवढे आक्रमक झाले होते की पोलिसांवर लपून राहण्याची वेळ आली.

आरजी कार हॉस्पिटलमध्ये झालेल्या तोडफोडीदरम्यान सोशल मीडियावर काही व्हिडिओ समोर आले आहेत. शेकडो लोकांचा जमाव हॉस्पिटलमध्ये कसा घुसला, गोंधळ घातला आणि डॉक्टरांना लक्ष्य कसे केले, हे या व्हिडिओंमध्ये दिसून आले. ४० लोकांचा एक गट हॉस्पिटलच्या आवारात घुसला. त्यांनी मालमत्तेचे नुकसान केले आणि पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या वापराव्या लागल्या. मात्र तरीही जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

दंगलखोरांनी केलेल्या हल्ल्यानंतर प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या भीषण बलात्कार आणि हत्येनतर रुग्णालयात तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या परिचारिकांकडे आश्रय घेतला. एका नर्सने सांगितले की, "पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या भडकलेल्या जमापेक्षा कमी होती. त्यामुळे पोलिसांनी आमच्याकडे सुरक्षा मागितली. ड्युटीवर असलेले दोन अधिकाऱ्यांनी कृपया आम्हाला तुमच्या वॉर्डात लपवा, असं म्हटलं."

नर्सच्या म्हणण्यानुसार, जमावाचा रोष त्या सेमिनार रूमवर होता जिथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरची हत्या करण्यात आली होती. त्यांना सेमिनार रूममध्ये प्रवेश करायचा होता. त्यांचे मुख्य लक्ष्य सेमिनार रुम होती. त्यांनी तिसऱ्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला पण ते जाऊ शकले नाहीत. त्यांनी दुसरा मजला उद्ध्वस्त केला. त्यांना वाटले असेल की हा तो मजला आहे जिथे डॉक्टरची हत्या झाली.

दरम्यान, बुधवारी रात्री ११.५५ वाजता 'रिक्लेम द नाईट' मोहिमेअंतर्गत राज्यभरात निदर्शने सुरू झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोहिमेला वेग आला, कोलकातामधील अनेक ऐतिहासिक स्थळांसह लहान शहरे आणि मोठ्या शहरातील प्रमुख भागात हे आंदोलन पसरले होते. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस