शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Sanjay Roy : कोर्टात ढसाढसा रडला संजय रॉय; CBI चे वकील आले ४० मिनिटं उशिरा, न्यायाधीश झाले नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 08:27 IST

Kolkata Doctor Case And Sanjay Roy : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका न्यायालयाने येथील सरकारी रुग्णालयात ट्रेनी डॉक्टर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका न्यायालयाने येथील सरकारी रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. संजय रॉयला २० सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरजी कर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश संतप्त झाला होता. विविध राज्यातील डॉक्टरांनी एकजूट करून संप केला. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर डॉक्टर कामावर परतले. 

ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आरोपी संजय रॉयच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. कोर्टात हजर होताच संजय रॉय ढसाढसा रडायला लागल्याचं सूत्रांनी सांगितलं. प्रकरणाशी संबंधित वकील कोर्ट रूममध्ये उपस्थित होते, तर आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजर केलं होतं. सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली तेव्हा संजय रडायला लागला. स्‍टेट लीगल असिस्‍टेंटने नियुक्त केलेल्या रॉयच्या वकिलाने जामिनाची विनंती केली आणि सांगितलं की संजयला फसवलं गेलं आहे.

सीबीआयचे वकील आले ४० मिनिटं उशिरा 

दुसरीकडे, ४० मिनिटं उशिराने न्यायालयात पोहोचलेल्या सीबीआयच्या वकिलाने या प्रकरणाच्या तपासात अडथळे येत असल्याचे सांगत जामीन अर्जाला विरोध केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी रॉयला१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तत्पूर्वी, न्यायाधीशांनी सीबीआय तपास अधिकारी (IO) आणि वकील यांच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय एजन्सी या प्रकरणाचा तपास करत आहे. सीबीआयचे वकील न्यायालयात उशिरा पोहोचल्याने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला.

तृणमूल काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल

तृणमूल काँग्रेसने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, तपास अधिकारी कुठे होते? वकील कुठे होते... ते कुठेच दिसत नव्हते. याप्रकरणी सीबीआयची ही पूर्णपणे उदासीनता आहे. हे जाणूनबुजून न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा आणणारे आहे, ज्यामध्ये सीबीआय भाजपाच्या विश्वासू मित्राची भूमिका बजावत आहे, ९ ऑगस्ट रोजी सकाळी पोलिसांना आरजी कर मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये एका ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह सापडला. त्यानंतर संजय रॉयला कोलकाता पोलिसांनी दुसऱ्या दिवशी अटक केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगालCBIगुन्हा अन्वेषण विभागCourtन्यायालय