१० मुलं असलेल्या हिंदू कुटुंबाला शिवसेनेकडून २१ हजार रुपयांचे बक्षिस

By Admin | Updated: October 26, 2014 16:34 IST2014-10-26T12:47:09+5:302014-10-26T16:34:34+5:30

१० किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असलेल्या हिंदू कुटुंबाला २१ हजार रुपये देऊ अशी अजब घोषणा उत्तरप्रदेशमधील शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल सिंह यांनी केली आहे.

A reward of Rs. 21 thousand from Shiv Sena for a Hindu family of 10 children | १० मुलं असलेल्या हिंदू कुटुंबाला शिवसेनेकडून २१ हजार रुपयांचे बक्षिस

१० मुलं असलेल्या हिंदू कुटुंबाला शिवसेनेकडून २१ हजार रुपयांचे बक्षिस

>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. २६ - दहा किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असलेल्या हिंदू कुटुंबाला २१ हजार रुपये देऊ अशी अजब घोषणा उत्तरप्रदेशमधील शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल सिंह यांनी केली आहे. उत्तरप्रदेशमध्ये अन्य धर्मांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचे सिंह यांचे म्हणणे आहे.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपाच्या लव्ह जिहादनंतर आता शिवसेनेने मोठ्या हिंदू कुटुंबांना प्रशस्तीपत्रक आणि २१ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. 'राष्ट्र हितासाठी हिंदुंची संख्या वाढावी' यासाठी ही मोहीम राबवणार असल्याचे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी म्हटले आहे. 'बहुसंख्य हिंदू कुटुंबनियोजनाला प्राधान्य देत असले तरी अन्य धर्मांमध्ये कुटुंबनियोजनाला फारसे महत्त्व दिले जात नसल्याने अन्य धर्मीयांची लोकसंख्या दिवसेगणिक वाढत आहे. त्यामुळ हिंदूंची लोकसंख्या वाढवणे ही काळाची गरज आहे असे अनिल सिंह यांनी सांगितले. कुटुंब नियोजनाचा निषेध म्हणून १ नोव्हेंबररोजी उत्तरप्रदेशमधील आरोग्य केंद्रांना टाळे ठोकून आंदोलन करणार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले. तसेच नोव्हेंबर अखेरीस १० पेक्षा अधिक मुलं असलेल्या हिंदू कुटुंबाना २१ हजार रुपये व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करु असेही त्यांनी नमूद केले. सात वर्षांपूर्वीही शिवसेनेने उत्तरप्रदेशमध्ये हा कार्यक्रम राबवला होता अशी आठवणही त्यांनी करुन दिली. 
दरम्यान, शिवसेनेच्या या घोषणेनंतर उत्तरप्रदेशमधील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. शिवसेना हिंदू - मुस्लीमांमध्ये तणाव करुन समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याची टीका काँग्रेस नेते रशिद अल्वी यांनी केली आहे. तर समाजवादी पक्षाचे नेते राजेंद्र चौधरी यांनी शिवसेनेचा हा कार्यक्रम लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले आहे.

Web Title: A reward of Rs. 21 thousand from Shiv Sena for a Hindu family of 10 children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.