शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

साडेतीन वर्षांत दीड लाख अपघातग्रस्तांना नवसंजीवनी; १०८ रुग्णवाहिका वरदान; ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 06:20 IST

अपघातातील गंभीर जखमींवर ‘गोल्डन अवर’मध्ये मोफत उपचार केले जातात. अपघातानंतर १५ ते २० मिनिटांत १०८ रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचते. गंभीर जखमी व उपचारांची तात्काळ आवश्यकता असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळतो. पहिल्या ७२ तासांत ठराविक रकमेपर्यंत उपचारांची तरतूद आहे.

 स्नेहा मोरे -

मुंबई : अपघात हे सांगून होत नसतात, परंतु ते टाळणे अथवा इजा होऊ नये व कमीतकमी दुखापत व्हावी, यासाठी मात्र आपण काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच त्वरित काय उपचार करावेत हेही महत्त्वाचे आहे. राज्यात मागील तीन वर्षांत २०१९ ते २०२२ या काळात १ लाख ५३ हजार ३०० अपघातग्रस्तांना १०८ रुग्णवाहिकेने नवसंजीवनी दिली. अपघातातील गंभीर जखमींवर ‘गोल्डन अवर’मध्ये मोफत उपचार केले जातात. अपघातानंतर १५ ते २० मिनिटांत १०८ रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचते. गंभीर जखमी व उपचारांची तात्काळ आवश्यकता असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळतो. पहिल्या ७२ तासांत ठराविक रकमेपर्यंत उपचारांची तरतूद आहे.  

हे लक्षात ठेवा!- जखमींचा श्वासोच्छ् वास व हृदयाचे ठोके व्यवस्थित आहे का, हे बघा. - रुग्णवाहिकेला बोलवा, हॉस्पिटलशी संपर्क करा. त्याचा रक्तस्राव थांबवा. - हृदयाचे ठोके लागत नसतील तर त्याला तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास द्या व त्याची छाती हाताने दाबून पंप करा. - फ्रॅक्चर असल्यास त्या भागाला आधार देऊन त्याची हालचाल थांबवा. 

कालावधी    किती अपघातग्रस्तांना मदत२०१९                    ५९०१२ २०२०                   ३६९८६ २०२१                   ४७३०२२०२२                   १०३०५ 

अपघात टाळण्यासाठी व झाल्यानंतर काय करावे, याचे प्रबोधन होण्याचीही गरज आहे. अपघात झाल्यापासून एक तासात उपचार मिळाल्यास रुग्ण बचावण्याची शक्यता असते. या कालावधीला  ‘गोल्डन अवर’ असे संबोधले जाते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला तातडीने रुग्णालयात पोहोचवून उपचार सुरू होणे फार गरजेचे असते. वेळीच उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचवणे शक्य होते.- डॉ. किशोरी बडे, हाडविकार तज्ज्ञ 

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटल