सुधारित/ केजरीवाल यांचा आज शपथविधी रामलीला मैदान सज्ज

By Admin | Updated: February 13, 2015 23:10 IST2015-02-13T23:10:58+5:302015-02-13T23:10:58+5:30

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेतील अभूतपूर्व विजयानंतर आम आदमी पार्टीचे नेते ४६ वर्षीय अरविंद केजरीवाल आज शनिवारी ऐतिहासिक रामलीला मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्लीतील राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची शिफारस केल्याच्या आधारावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केजरीवाल यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने एका निवेदनात नमूद केले आहे.

Revised / Kejriwal sworn in today's Ramlila Maidan | सुधारित/ केजरीवाल यांचा आज शपथविधी रामलीला मैदान सज्ज

सुधारित/ केजरीवाल यांचा आज शपथविधी रामलीला मैदान सज्ज

ी दिल्ली : दिल्ली विधानसभेतील अभूतपूर्व विजयानंतर आम आदमी पार्टीचे नेते ४६ वर्षीय अरविंद केजरीवाल आज शनिवारी ऐतिहासिक रामलीला मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्लीतील राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची शिफारस केल्याच्या आधारावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केजरीवाल यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने एका निवेदनात नमूद केले आहे.
केजरीवाल दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असून त्यांचे निकटस्थ सहकारी पटपडगंजचे आमदार मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्री बनतील. यावेळी मंत्रिमंडळात गोपाल राय, जितेंद्र तोमर, संदीप कुमार, सत्येंद्र जैन आणि असीम अहमद खान यांच्यासारख्या नव्या चेहऱ्यांना स्थान मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. जवळजवळ वर्षभरानंतर केजरीवालांच्या शपथविधीसाठी रामलीला मैदान पुन्हा सजले आहे. आम आदमी पार्टीच्या समर्थकांची यावेळी वाढणारी गर्दी पाहता चोख सुरक्षा बंदोबस्तासाठी १२०० पोलीस आणि अधिकाऱ्यांचा ताफा तैनात असेल.
बॉक्स
केजरीवालांना ताप
अरविंद केजरीवाल यांच्या अंगात गेल्या चार दिवसांपासून ताप असून अद्यापही त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झालेली नाही. अंगात ताप असतानाच त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी मेट्रोमधून शपथविधीला जाण्याचा बेत रद्द केला आहे. ते सकाळी १०.३० वाजता कुटुंबीयांसह कारने घरून निघतील. शिष्टाचारानुसार वाहतूक पोलिसांनी त्यांच्या प्रवासाचा मार्ग निश्चित केला असून बाराखंबा रोडवर वाहतूक पोलीस त्यांच्या सोबतीला असतील.(लोकमत न्यूज नेटवर्क) (आणखी वृत्त-देश-परदेश)

Web Title: Revised / Kejriwal sworn in today's Ramlila Maidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.