वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीची आढावा बैठक
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:37+5:302015-02-14T23:51:37+5:30
अकोला: १२ ते १४ डिसेंबर २०१४ रोजी पार पडलेल्या दुसर्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाची आढावा बैठक शनिवारी जिल्हा परिषद कर्मचारी भवनात पार पडली.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीची आढावा बैठक
अ ोला: १२ ते १४ डिसेंबर २०१४ रोजी पार पडलेल्या दुसर्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाची आढावा बैठक शनिवारी जिल्हा परिषद कर्मचारी भवनात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गुरुदेव प्रचारक ॲड. रामसिंग राजपूत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य भाई प्रदीप देशमुख, मार्तंडराव माळी, प्रा. यादव वक्ते, ॲड. विनोद साकरकर, राधेश्याम राठी, दीपक भरणे, ॲड. नितीन धूत, सेवा समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष भोरे, सचिव रामेश्वर बरगट, अरविंद भोंडे उपस्थित होते. प्रास्ताविक ॲड. संतोष भोरे यांनी केले. संचालन गोपाल गाडगे यांनी तर आभारप्रदर्शन अजय कणसरे यांनी केले. यावेळी माणिकराव कौसल, दिलीप सावरकर, ॲड. बंगाले, श्रीकृष्ण ठोंबरे, आशा नावकार, गजानन लांडे, मोहन सरप, डॉ. नवीन तिरूख, डॉ. वाघोळे, नंदकिशोर पाटील, अरुण म्हैसने आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रशांत ठाकरे, राजेंद्र झामरे, गजानन जळमकार, बाळू सरोदे, रामराव पाटखेडे, डॉ. प्रकाश मानकर यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.