मिठी नदीतील प्रदूषणावर आढावा बैठक
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:14+5:302015-02-14T23:50:14+5:30
मिठी नदीतील प्रदूषणावर आढावा बैठक

मिठी नदीतील प्रदूषणावर आढावा बैठक
म ठी नदीतील प्रदूषणावर आढावा बैठकमुंबई : मिठी नदीला झोपड्यांच्या विळख्यातून मुक्त करण्याची घोषणा करणार्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महापौर बंगल्यावर आज बैठक घेतली़ मिठी नदीच्या प्रदूषणबाबत केलेला पाहणी अहवाल या बैठकीत सादर करण्यात आला़२६ जुलै २००५ मध्ये मुंबईला मगरमिठीत घेणार्या मिठी नदीच्या रुंदीकरणाचे काम अनेक वर्षांपासून सुरु आहे़ या कामाचा आढावा घेण्यासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महापालिका, एमएमआरडीए आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्यांबरोबर या परिसराचा गेल्या महिन्यात दौरा केला़यासंदर्भात महापौर बंगल्यावर आज बैठक बोलाविण्यात आली़ यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालिका आयुक्त सीताराम कुंटेही उपस्थित होते़ विमानतळ प्राधिकरणाने नाल्यावर बांधलेली भिंत म्हणजे अतिक्रमणच असल्याची चर्चा यावेळी झाली़ यावर पुढील कारवाईबाबत २ मार्च रोजी बैठक बोलाविण्यात आल्याचे समजते़ (प्रतिनिधी)