ब्रेकअपचा बदला - प्रेयसीने 'त्याचे' नको त्या अवस्थेतले फोटो केले अपलोड
By Admin | Updated: February 8, 2017 13:31 IST2017-02-08T13:31:35+5:302017-02-08T13:31:35+5:30
महिलांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याची अनेक उदहारणे असून, अशा प्रकरणांमध्ये महिलाच सर्वाधिक पीडित आहेत.

ब्रेकअपचा बदला - प्रेयसीने 'त्याचे' नको त्या अवस्थेतले फोटो केले अपलोड
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 8 - महिलांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याची अनेक उदहारणे असून, अशा प्रकरणांमध्ये महिलाच सर्वाधिक पीडित आहेत. पण अहमदाबादमध्ये बिलकुल याउलट एक प्रकरण समोर आले आहे. इथे प्रेयसीने ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी म्हणून प्रियकराचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर अपलोड केले. जेव्हा या युवकाला त्याच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट उघडून त्याचे नको त्या अवस्थेतले फोटो अपलोड केल्याचे समजले तेव्हा त्याला धक्काच बसला.
या युवकाचे नुकतेच ब्रेकअप झाले होते. त्यामुळे बदला घेण्यासाठी म्हणून एक्स गर्लफ्रेंडने असे फोटो अपलोड केल्याचा त्याला संशय आहे. स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये त्याने यासंबंधी गुन्हा दाखल केलेला नाही. सध्या हा मुलगा आणि त्याचे कुटुंबिय अकाऊंट ब्लॉक करण्यासह आणखी काय कारवाई करता येईल यासाठी सायबर कायद्यामध्ये तज्ञ असलेल्या संस्थांचा सल्ला घेत आहेत. या मुलाचे अनेक मुलींबरोबर प्रेमसंबंध होते. त्यामुळे ज्या प्रकारचे फोटो आहेत त्या आधारावर त्याने काही मुलींची नावे संशयित म्हणून सांगितली आहेत.
काल 7 फेब्रुवारीला जगभरात सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने गुन्हे शाखेने आयोजित केलेल्या जागरुकता अभियानात या प्रकरणावर चर्चा झाली. अनेक आरोपी बदला घेण्यासाठी म्हणून मुलींचे फोन नंबर किंवा त्यांचे मॉर्फ केलेले आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.