हनिमूनवरुन परतताच पत्नी एअरपोर्टवरुन प्रियकरासोबत गेली पळून

By Admin | Updated: May 18, 2016 10:28 IST2016-05-18T10:22:31+5:302016-05-18T10:28:03+5:30

लग्नानंतर आयुष्यातला एक सुंदर अनुभव म्हणजे हनिमून. नवविवाहीत जोडपे हनिमूनला गेल्यानंतर त्यांच्यात अधिक जवळीक,प्रेम निर्माण होते.

On returning from honeymoon, the wife ran away with the beloved girl from the airport | हनिमूनवरुन परतताच पत्नी एअरपोर्टवरुन प्रियकरासोबत गेली पळून

हनिमूनवरुन परतताच पत्नी एअरपोर्टवरुन प्रियकरासोबत गेली पळून

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १८ - लग्नानंतर आयुष्यातला एक सुंदर अनुभव म्हणजे हनिमून. नवविवाहीत जोडपे हनिमूनला गेल्यानंतर त्यांच्यात अधिक जवळीक,प्रेम निर्माण होते. कारण हनिमूनच्या दिवसांमध्ये परस्परांना समजून घ्यायला वेळ मिळतो. पण लखनऊमधल्या एका व्यक्तीसाठी हनिमूनचा शेवट अत्यंत धक्कादायक झाला. 
 
हनिमून संपवून नवविवाहीत जोडपे उत्तरप्रदेशातील आपल्या घरच्या वाटेवर असताना पत्नी विमानतळावरुनच प्रियकरासोबत पळून गेली. लखनऊमध्ये रहाणा-या व्यकीचा विवाह झाल्यानंतर दोघे पती-पत्नी हनिमूनसाठी हिमाचलप्रदेशमध्ये गेले होते. सोमवारी संध्याकाळी दोघे उत्तरप्रदेशला जाण्यासाठी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. 
 
त्यावेळी पत्नी फ्रेश होण्याच्या बहाण्याने वॉशरुममध्ये गेली ती परतलीच नाही. तब्बल अर्धातास होऊन गेला तरी पत्नी बाहेर येत नाही म्हणून पतीने विमानतळावरील सुरक्षा कर्मचा-यांकडे तक्रार केली. त्यावेळी विमानतळाची सुरक्षा संभाळणा-या सीआयएसएफच्या जवानांनी पतीसोबत सीसीटीव्ही फुटेज तपासले. 
 
महिला वॉशरुममध्ये गेली तेव्हा तिने निळी साडी घातली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक बुरखाधारी महिला बाहेर येताना दिसली. त्या महिलेची उंची आणि बाहयरुपावरुन ती महिला आपली पत्नीच असल्याचे त्या व्यक्तीने ओळखले. विमानतळाच्या प्रवेशव्दारावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. 
 
त्यामध्ये बुरखाधारी महिला एका अज्ञात व्यक्तीला भेटते. दोघे टॅक्सी स्टॅण्डकडे जातात. तिथे त्यांना आणखी एक व्यक्ती भेटते. त्यानंतर तिघेही गर्दीमध्ये हरवून जातात. पत्नी वॉशरुममध्ये जाताना तिची बॅग आणि मोबाईल पतीकडेच ठेवून गेली होती. वॉशरुममध्ये आधीच कोणीतरी बुरखा घेऊन तयार होतं असा पोलिसांचा अंदाज आहे. आपल्याला कोणी शोधू नये यासाठी ती महिला मोबाईल फोन नव-याकडे सोडून गेली. या प्रकारानंतर हताशा झालेला नवरा बदनामी टाळण्यासाठी कोणतीही तक्रार न करता तिथून निघून गेला. 
 
 

Web Title: On returning from honeymoon, the wife ran away with the beloved girl from the airport