शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरी अतिरेकी संघटनांत पाकिस्तानचे निवृत्त सैनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 12:02 IST

खात्मा केल्याने पाकच्या कटाला जबर धक्का : ले. जनरल द्विवेदी

जम्मू : पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. दहशतवादी संघटनांमध्ये पाकिस्तानचे निवृत्त सैनिक आहेत, असे लष्कराच्या उत्तरी कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी सांगितले.    

बुधवार आणि गुरुवारी राजौरी जिल्ह्यातील धरमसाल भागातील बाजीमल भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या दोन कॅप्टनसह पाच लष्करी जवानांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर द्विवेदी यांनी हे विधान केले. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेला आणि पाकचा रहिवासी असलेला प्रमुख लष्कर कमांडर क्वारीसह दोन दहशतवाद्यांना ठार केले. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी सांगितले की, दोन परदेशी दहशतवाद्यांचा खात्मा हा प्रदेश अस्थिर करण्याच्या पाकिस्तानच्या कटाला मोठा धक्का आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

पाकला स्थानिकांचा मिळेना पाठिंबा...दहशतवाद्यांमध्ये काही पाकिस्तानी स्पेशल फोर्सच्या जवानांच्या उपस्थितीबद्दल विचारले असता, लेफ्टनंट जनरल म्हणाले की, आम्ही जेव्हा दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला कळले की त्यांच्यापैकी काही (पाकिस्तानी लष्कराचे) निवृत्त सैनिक आहेत. स्थानिक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यास इच्छुक नसल्याने तसेच पाकिस्तानमधील स्थानिक नागरिकांचा, विशेषत: तरुणांचा पाठिंबा नसल्यामुळे पाकिस्तान परदेशी दहशतवाद्यांना पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. 

शहीद मुलगा कॅप्टन शुभम गुप्ताच्या पार्थिवाला अभिवादन करताना वडिलांनी हंबरडा फोडला होता.

२०२३ मध्ये जम्मूत १४ जवान, २५ दहशतवाद्यांसह ४६ जण मारले गेले.

आणखी हल्ले होण्याची भीतीलोकसभा निवडणुकीसह आगामी निवडणुकांमध्ये अडथळा आणण्यासाठी येत्या काही महिन्यांत आणखी दहशतवादी पाठवण्याचा पाकचा हेतू आहे का, असे विचारले असता त्यांनी ‘हो’ असे उत्तर दिले.

लग्न १५ दिवसांनी होणार होते, पण...अलिगडमधील शहीद सचिन लाऊर यांचे ८ डिसेंबरला लग्न होणार होते. कुटुंबीय त्यासाठी तयारी करत होते. ८ डिसेंबरला मथुरेत सचिन यांच्या लग्नाची मिरवणूक निघणार होती, पण काळाला हे मान्य नव्हते.

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवादPakistanपाकिस्तान