किरकोळ महागाई 5.5 टक्क्यांवर
By Admin | Updated: November 12, 2014 23:35 IST2014-11-12T23:35:51+5:302014-11-12T23:35:51+5:30
अन्नधान्य व खाद्यपदार्थाच्या किमती उतरल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाईनेही खालचा सूर लावला असून, 5.52 टक्क्यार्पयत उतरत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे.

किरकोळ महागाई 5.5 टक्क्यांवर
नवी दिल्ली : अन्नधान्य व खाद्यपदार्थाच्या किमती उतरल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाईनेही खालचा सूर लावला असून, 5.52 टक्क्यार्पयत उतरत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे.
ग्राहक किमतीचा निर्देशांक घसरण्याचा हा सलग चौथा महिना आहे. गेल्या महिन्यात हा निर्देशांक 6.46 टक्के होता. एकूण खाद्यपदार्थाच्या किमती खाली आल्या असून, ग्राहक किमतीचा निर्देशांक 5.59 टक्क्यांर्पयत खाली आला आहे. याआधीच्या महिन्यात तो 7.67 टक्के होता.
भाज्यांच्या किरकोळ किमती 1.45 टक्क्याने उतरल्या आहेत.
सप्टेंबरमध्ये त्या 8.59 टक्क्यार्पयत वाढल्या होत्या. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रलयाने ही आकडेवारी जारी केली आहे. फळांच्या किमती सप्टेंबरमध्ये 22.4 टक्के होत्या. त्या या महिन्यात 17.49 टक्क्यांवर आल्या आहेत. तसेच अंडी, मासे व मांस या पदार्थाच्या किमती 6.35 टक्क्यांवरून 6.34 टक्के झाल्या आहेत. ठोक किमतीची आकडेवारी शुक्रवारी जारी केली जाणार आहे. ठोक किमती पाच वर्षाच्या नीचांकावर आल्या असून, खाद्य पदार्थ व इंधनाच्या किमती कमी झाल्यामुळे त्या सप्टेंबर महिन्यात 2.38 टक्क्यांर्पयत आल्या होत्या.