माजी मंत्र्यांच्या हत्येप्रकरणी 40 वर्षानी निकाल
By Admin | Updated: December 9, 2014 01:49 IST2014-12-09T01:49:36+5:302014-12-09T01:49:36+5:30
40 वर्षानंतर दिल्लीच्या एका न्यायालयाने सोमवारी या हत्याकांडातील चार आरोपींना हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली दोषी ठरविले आहे.

माजी मंत्र्यांच्या हत्येप्रकरणी 40 वर्षानी निकाल
नवी दिल्ली : बिहारच्या समस्तीपूर रेल्वेस्थानकावर 2 जानेवारी 1975 रोजी बॉम्बस्फोटात तत्कालीन रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्र यांची हत्या करण्यात आल्याच्या 40 वर्षानंतर दिल्लीच्या एका न्यायालयाने सोमवारी या हत्याकांडातील चार आरोपींना हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली दोषी ठरविले आहे.
जिल्हा न्यायाधीश विनोद गोयल यांनी रंजन द्विवेदी, संतोषानंद अवधूत, सुदेवानंद अवधूत आणि गोपालजी या चौघांना दोषी ठरविले. न्यायालयाने या चौघांच्या शिक्षेच्या कालावधीबाबत युक्तिवाद ऐकून घेण्यासाठी 15 डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे. त्यांना जन्मठेप वा फाशी ठोठावली जाऊ शकते. आदेशाला वरच्या न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे आरोपींच्या वकिलांनी सांगितले. आनंद मार्ग संघटनेच्या अन्य चार जणांसोबत त्याला आरोपी बनविण्यात आले होते. त्यातील एकाचा मृत्यू झालेला आहे.
काय आहे प्रकरण? बिहारच्या समस्तीपूर रेल्वेस्थानकावर 2 जानेवारी 1975 रोजी आयोजित कार्यक्रमात उपस्थित असलेले तत्कालीन रेल्वेमंत्री एल.एन. मिश्र हे कार्यक्रमस्थळी झालेल्या बॉम्बस्फोटात गंभीर जखमी झाले होते. दुस:या दिवशी त्यांचे निधन झाले होते. आणखी दोघे ठार झाले होते.
च्7 जानेवारी 1975 रोजी सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल केला. 1 नोव्हेंबर 1977 रोजी पाटणा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 17 डिसेंबर 1979 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून हा खटला दिल्लीत स्थालांतरित करण्यात आला.
च्12 सप्टेंबर 2क्12 रोजी या हत्याकांडामागे आनंद मार्ग्ीचा हात असल्याचे सीबीआयने सांगितले. 1क् नोव्हेंबर 2क्14 रोजी न्यायालयाने 8 डिसेंबरला निकाल देण्याची घोषणा केली चौघांना दोषी ठरविले.