शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकप्रतिनिधींबाबतच्या याचिकेचा निकाल राखीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 06:37 IST

अपात्र ठरवण्याची सुप्रीम कोर्टात विनंती

नवी दिल्ली : फौजदारी खटले दाखल झालेल्या लोकप्रतिनिधींना गुन्हा सिद्ध होण्याआधीच अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल झालेल्यांना निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, असेही या याचिकांत म्हटले आहे.

दिनेश द्विवेदी यांच्या पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन (पीईएफ) या स्वयंसेवी संस्थेसह आणखी काही जणांनी केलेल्या याचिकांची सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. या याचिकेत म्हटले आहे की, २०१४ साली ३४ टक्के लोकप्रतिनिधी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. त्यामुळे संसदेत राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याचा कायदा करणे निव्वळ अशक्य आहे. केंद्र सरकार, केंद्रीय निवडणूक आयोगासहित संबंधितांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर यावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. केंद्राच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल कोर्टात म्हणाले की, जोवर एखाद्यावर गुन्हा सिद्ध होत नाही तोवर त्याला निर्दोषच मानण्यात येते. कोणत्याही व्यक्तीच्या मतदानाच्या व निवडणुकीला उभे राहण्याच्या हक्कावर न्यायालय गदा आणू शकत नाही.पूर्वेतिहास माहीत हवाखंडपीठाने म्हटले आहे की, विधिमंडळाच्या अधिकारांची गळचेपी करण्याचा न्यायालयाचा हेतू नाही. मात्र आपल्या उमेदवाराचा पूर्वेतिहास जाणून घेण्याचा मतदारांना हक्क आहे. उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती राजकीय पक्षांनी आधीच जाहीर करावी म्हणजे मतदारांना योग्य उमेदवाराची निवड करणे सुलभ होईल. त्यासाठी काही नियम करता येतील का, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMember of parliamentखासदारElectionनिवडणूक