शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

साखर निर्यातीवरील निर्बंध कायम; कारखान्यांसाठी कोटा पद्धतच राहणार, केंद्राची अधिसूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 10:50 IST

चालू हंगामातही ४१० लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे.

- चंद्रकांत कित्तुरे

कोल्हापूर / नवी दिल्ली : साखरेचे भाव वाढू नयेत, यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यातीवरील निर्बंधांना ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देणारी अधिसूचना जारी केली आहे. यामुळे साखरेच्या निर्यातीसाठी कारखानानिहाय कोटा पद्धतच कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या हंगामात ३९५ लाख टन साखरेचे उत्पादन करुन भारत जगातील सर्वाधिक साखर उत्पादक देश बनला आहे. यात इथेनॉलकडे वळविलेल्या ३५ लाख टन साखरेचाही समावेश आहे. 

चालू हंगामातही ४१० लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. यातील ४५ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविली जाईल आणि ३६५ लाख टन प्रत्यक्षात साखर उपलब्ध होईल. यात हंगामाच्या सुरुवातीची ५३ लाख टन शिल्लक साखर धरली तर ४१८ लाख टन साखर उपलब्ध होते. देशाची गरज २८० लाख टनांची आहे. 

नोव्हेंबरमध्ये २२ लाख टन साखर बाजारात येणार

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात २२ लाख टन साखरेचा कोटा खुल्या बाजारात विक्रीला कारखान्यांना परवानगी देणारी अधिसूचनाही केंद्र सरकारने शुक्रवारी जारी केली आहे.  हा कोटा गेल्या नोव्हेंबरपेक्षा ५० हजार टनांनी कमी आहे. सणांचा हंगाम संपला असला तरी ८ नोव्हेंबरपासून लग्नसराई सुरू होत आहे.  यामुळे साखरेची मागणी कायम राहणार आहे.

महाराष्ट्राच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता

मे महिन्यात साखर निर्यातीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांची मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत होती. तत्पूर्वी केंद्र सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही तर साखर निर्यात खुली (ओपन जनरल लायसन्सअंतर्गत) होणार होती. मात्र, हे निर्बंध कायम ठेवून साखर निर्यात खुली करावी, या साखर उद्योगाच्या तसेच महाराष्ट्र सरकारच्या मागणीला केंद्र सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने