शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढ रोखण्यासाठी कांदा निर्यातीवर निर्बंध, प्रतिटन ८०० डॉलर किमान निर्यातदर निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 13:32 IST

दिवाळीचा सण आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कांद्याचे दर कडाडले

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ऐन दिवाळीआधी भडकलेले कांद्याचे दर काबूत आणण्यासाठी शनिवारी केंद्र सरकारने फ्री ऑन बोर्ड तत्त्वावर कांद्याचा किमान निर्यातदर प्रतिटन ८०० अमेरिकन डॉलर करण्यात येत असल्याची घोषणा केली. कांद्याच्या शिल्लक  साठ्यात भर घालण्यासाठी आणखी दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचीही केंद्राने घोषणा केली आहे.

कांद्याचा किमान निर्यातदर  प्रतिटन ८०० डॉलर निश्चित केल्यामुळे कोणत्याही निर्यातदाराला ६७ रुपये प्रतिकिलो दरापेक्षा कमी दराने कांदा निर्यात करता येणार नाही. हा निर्णय २९ ऑक्टोबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल. या निर्णयामुळे निर्यातीला आळा बसून देशात पुरेशा प्रमाणात कांदा उपलब्ध होईल. ग्राहकांना किफायतशीर दरात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने पाच लाख टन कांद्याची खरेदी केली आहे.

दिल्लीत कांदा भडकला

  • दिवाळीचा सण आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कांद्याचे दर कडाडले आहेत.
  • दिल्लीत अपुऱ्या पुरवठ्यामुळे कांद्याने प्रतिकिलो ७० ते ८० रुपये भाव गाठला. लवकरच तो शंभरी गाठेल, अशी शक्यता आहे. 
  • १९९८ साली याच मोसमात झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान कांद्याचे भाव गगनाला पोहोचल्यामुळे भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला होता.
टॅग्स :onionकांदाdelhiदिल्ली