धक्कादायक! दाढी अन् पगडी घातल्यानं शीख तरुणाला मॅनेजरनं Restaurantमध्ये दिला नाही प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 05:39 PM2019-09-11T17:39:21+5:302019-09-11T17:45:47+5:30

शीख समुदायातील लोकांना रेस्टॉरंट आणि क्लबमध्ये प्रवेश दिला जात नसल्याच्या बऱ्याचशा घटना परदेशात घडत असतात.

restaurant denied entry of a sikh man due to his attire | धक्कादायक! दाढी अन् पगडी घातल्यानं शीख तरुणाला मॅनेजरनं Restaurantमध्ये दिला नाही प्रवेश

धक्कादायक! दाढी अन् पगडी घातल्यानं शीख तरुणाला मॅनेजरनं Restaurantमध्ये दिला नाही प्रवेश

Next
ठळक मुद्देदिल्लीतल्या एका रेस्टॉरंटमध्ये शीख फॅशन डिझायनरला प्रवेश करण्यास मनाई केली आहे. परम साहिब नावाच्या एका फॅशन डिझायनरच्या धर्म आणि पेहरावावर  रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं आक्षेप घेत प्रवेश नाकारला मी सरदार असल्यानंच मला प्रवेश दिला नाही

नवी दिल्लीः शीख समुदायातील लोकांना रेस्टॉरंट आणि क्लबमध्ये प्रवेश दिला जात नसल्याच्या बऱ्याचशा घटना परदेशात घडत असतात. परंतु आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही असे प्रकार समोर आले आहेत. दिल्लीतल्या एका रेस्टॉरंटमध्ये शीख फॅशन डिझायनरला प्रवेश करण्यास मनाई केली आहे.

परम साहिब नावाच्या एका फॅशन डिझायनरच्या धर्म आणि पेहरावावर  रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं आक्षेप घेत प्रवेश नाकारला आहे. त्यानंतर परम यानं याची माहिती स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिली. पाहता पाहताच त्यांची पोस्ट व्हायरल झाली. या विषयावरून गदारोळ झाल्यानंतर रेस्टॉरंट मालकाचे झोपेतून डोळे उघडले आणि त्यानंतर त्यानं माफी मागितली. त्याचबरोबर आरोपी मॅनेजरला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. 
मी सरदार असल्यानंच मला प्रवेश दिला नाही
परमनं स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सांगितलं की, मला आणि माझ्या मित्रांना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश दिला नाही. कारण मी सरदार आहे. माझी दाढी, पेहरावावर रेस्टॉरंट मॅनेजरला आक्षेप होता. त्याचदरम्यान काऊंटरवरील एकानं परमबरोबर असलेल्या महिलेशी छेडछाडही केली. काऊंटरवरच्या मॅनेजरनं सांगितलं की, आम्ही शीख लोकांना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश देत नाही.

 
रेस्टॉरंट मालकानं कबूल केली चूक, मॅनेजरला नोकरीवरून काढलं
या प्रकाराची रेस्टॉरंटच्या मालकानं गंभीर दखल घेतली असून, परम या शीख तरुणाचा अपमान केलेल्या मॅनेजरला कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. तसेच परम यानं इन्स्टाग्राम अकाऊंटवर रेस्टॉरंटनं दिलेला माफीनामाही पोस्ट केला आहे. 

Web Title: restaurant denied entry of a sikh man due to his attire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.