सीमेपलीकडच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देऊ- लष्करप्रमुख
By Admin | Updated: January 4, 2017 21:14 IST2017-01-04T21:10:50+5:302017-01-04T21:14:05+5:30
भारत सीमेपलीकडच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देईल.

सीमेपलीकडच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देऊ- लष्करप्रमुख
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - भारत सीमेपलीकडच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देईल. जेणेकरून पाकिस्तानलाही विद्रोह आणि दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या धोरणावर पुनर्विचार करावा लागेल, असं वक्तव्य नवे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी केलं आहे.
बिपीन रावत लष्कराचे उपप्रमुख असतानाच सर्जिकल स्ट्राइक आणि दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांनीही वेदना सहन केल्या पाहिजेत. मात्र त्यासाठी उत्तर देण्याचे माध्यम एक असायला हवे, असे निश्चित नाही. यावेळी त्यांनी पाकिस्तानकडून देण्यात येणा-या अणुहल्ल्याचाही खरपूस समाचार घेतला.
दरम्यान, सीमेच्या संरक्षणासाठी भारताला अणुहल्ल्याच्या धमक्याही रोखू शकणार नाहीत. बिपीन रावत यांनी 31 डिसेंबरला 27वे लष्कर प्रमुख म्हणून शपथ घेतली. त्यानंतर ते म्हणाले, पाकिस्तानला अशा प्रकारे उत्तर देऊ की फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याच्या धोरणात त्यांना बदल करावा लागेल. मात्र जर पाकिस्तानकडून वारंवार अणुहल्ल्याचा धमक्या येत असतील, तर भारतही त्याच्या विरोधासाठी मागेपुढे पाहणार नाही, असंही बिपीन रावत म्हणाले आहेत.