शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नोटिसांना उत्तर द्या; दंगेखोरांना ७ दिवसांची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 02:38 IST

उत्तर प्रदेशात हिंसक निदर्शने; सरकारने सुरू केली कारवाई, लखनौमध्ये दीडशे नोटिसा

लखनऊ : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी त्यांना उत्तर प्रदेश सरकारने नोटिसा बजावल्या आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी या दंगलखोरांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.निदर्शनांनंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निदर्शनांची छायाचित्रे व व्हिडिओ फिती यांची छाननी करून दंगेखोरांना शोधून काढा व त्यांना नोटिसा बजावा, असे आदेश पोलिसांना दिले होते. एकट्या लखनऊमध्ये सुमारे १५० नोटिसा बजावण्यात आल्या असून दंगेखोरांना स्वत:ची बाजू मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. स्पष्टीकरणामुळे चौकशी समितीचे समाधान न झाल्यास त्या दंगेखोरांकडून भरपाई वसुलीची प्रक्रिया सुरू केली जाईल.भरपाईची रक्कम भरण्याची ऐपत नसेल तर त्याची मालमत्ता जप्त केली जाईल. तिच्या लिलावातून येणाºया पैशातून भरपाईची वसुली होणार आहे. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱ्यांची मालमत्ता जप्त करून तिच्या लिलावातून भरपाई वसूल करावी या अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० साली दिलेल्या निकालाचा उत्तर प्रदेश सरकारने आपल्या कारवाईसाठी आधार घेतला आहे.निदर्शकांवर पोलिसांनी पाशवी बळाचा वापर केला हा आरोप खोडून काढण्यासाठी दंगेखोरांच्या व्हिडिओ फिती राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला पाठविण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाºयांना दिले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल निदर्शक खोटीनाटी माहिती अल्पसंख्याक समाजामध्ये पसरवत आहेत, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलेआहे. (वृत्तसंस्था)दोन आठवड्यांनी बाळाची भेटनागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने करणाºया व १९ नोव्हेंबर रोजी अटक झालेल्या दाम्पत्याला तब्बल दोन आठवड्यांनी गुरुवारी जामीन मिळाला. त्यानंतरच ते आपल्या १४ महिन्यांच्या बाळाला भेटू शकले.एकता व राजशेखर अशी त्यांची नावे असून इतक्या दिवसांनी आपल्या बाळाला पाहून दोघेही भावनिक झाले होते. हे दाम्पत्य स्वयंसेवी संस्था चालवितात. ते दोघे व अन्य ५६ निदर्शकांना वाराणसीतील न्यायालयाने जामीन मंजूर केला.बाळाला पाहिल्यानंतर मला झालेला आनंद शब्दांच्या पलीकडचा होता, असे एकताने पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकUttar Pradeshउत्तर प्रदेश