सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा ठराव
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:10+5:302015-04-13T23:53:10+5:30
लोहा : लोहा पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी व्ही़एऩ रंगवाळ पं़स़च्या कारभारात अपयशी ठरले असून त्यांच्या निष्क्रीयतेमुळे पं़स़तील विविध कामे खोळंबली आहेत़ १० रोजी लोहा पं़स़च्या सर्वसाधारण मासिक बैठकीत निष्क्रीय बीडीओ रंगवाळ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा एकमुखी ठराव घेण्यात आला़ मात्र पाणीपुरवठ्याच्या असंख्य तक्रारी असताना पं़स़ सदस्यांनी सदरील पाणीपुरवठा विषयी शब्द काढला नसल्याची चर्चा होत होती़ सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ढगे होते़ तर उपसभापती रोहीत पाटील, पं़स़ सदस्य लक्ष्मण बोडके, विजय शेटकर, माधव चांदणे, वैशाली शेळके, डॉ़दत्ता गवळी आदींची उपस्थिती होती़

सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा ठराव
ल हा : लोहा पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी व्ही़एऩ रंगवाळ पं़स़च्या कारभारात अपयशी ठरले असून त्यांच्या निष्क्रीयतेमुळे पं़स़तील विविध कामे खोळंबली आहेत़ १० रोजी लोहा पं़स़च्या सर्वसाधारण मासिक बैठकीत निष्क्रीय बीडीओ रंगवाळ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा एकमुखी ठराव घेण्यात आला़ मात्र पाणीपुरवठ्याच्या असंख्य तक्रारी असताना पं़स़ सदस्यांनी सदरील पाणीपुरवठा विषयी शब्द काढला नसल्याची चर्चा होत होती़ सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ढगे होते़ तर उपसभापती रोहीत पाटील, पं़स़ सदस्य लक्ष्मण बोडके, विजय शेटकर, माधव चांदणे, वैशाली शेळके, डॉ़दत्ता गवळी आदींची उपस्थिती होती़