शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मुसेवाला यांनीही काही राउंड केले होते फायर; हल्लेखाेरांचा प्रतिकार केल्याचे तपासात आले आढळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 08:04 IST

अंत्यसंस्कारानंतर मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह आणि आई चरणकौर यांनी उपस्थित लोकांना हात जोडून त्यांचे आभार मानले.

- बलवंत तक्षक 

चंडीगड : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धू मुसेवाला यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. 

मुसेवाला यांची अंत्ययात्रा त्यांच्या आवडत्या ट्रॅक्टर ५९११ मध्ये काढण्यात आली. अनेक पंजाबी गाण्यांमध्ये त्यांनी या ट्रॅक्टरचा उल्लेख केला होता. सिद्धू यांच्या आईने अंत्ययात्रा सुरू होण्यापूर्वी मुलाच्या डोक्यावरून हात फिरविला आणि वडिलांनी सिद्धू यांच्या डोक्यावर मुंडावळी लावली तेव्हा उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. ११ जून रोजी मुसेवाला यांचा २९ वा वाढदिवस होता आणि जून महिन्यातच त्यांचा विवाह होता. अंतिम प्रवासाला निघालेल्या मुलाकडे आई- वडील डोळे भरून पाहत होते.

अंत्यसंस्कारानंतर मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह आणि आई चरणकौर यांनी उपस्थित लोकांना हात जोडून त्यांचे आभार मानले. भावुक झालेल्या वडिलांनी डोक्यावरील पगडी काढून अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांचे आभार मानले. यावेळी उपस्थित लोकांनी ‘पंजाब सरकार मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. मुसेवाला यांची सुरक्षा कमी केल्याबद्दल लोकांनी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. मुसेवाला यांच्या शरीरावर गोळ्यांच्या २४ खुणा आढळून आल्या.

अर्ध्यावरती डाव मोडला...सिद्धू मुसेवाला हे सध्या लग्नाच्या तयारीत होते. जूनमध्ये लग्न होते. संगरुर जिल्ह्यातील संघरेडी गावातील अमनदीप कौर यांच्याशी त्यांचा विवाह होणार होता. सध्या त्या कॅनडात राहतात व तेथील स्थायी नागरिक आहेत. अमनदीप आणि सिद्धू मुसेवाला यांचा विवाह दोन वर्षांपूर्वीच ठरला होता. अमनदीप कौर या अकाली दलाच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या भाची आहेत. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसामधून विधानसभा निवडणूक लढविल्याने विवाह पुढे ढकलला.  

मुसेवाला यांनी केला आत्मरक्षणाचा प्रयत्न

मुसेवाला यांनी हल्लेखाेरांचा प्रतिकार केल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यांच्या जीपमधून एक पिस्तूल सापडले आहे. त्यातून काही राउंड फायर झाले आहेत. मुसेवाला यांनी आत्मरक्षणासाठी त्यातून गाेळ्या झाडल्या. हल्लेखाेरांनी सर्वप्रथम मुसेवाला यांच्या गाडीच्या टायरवर गाेळ्या झाडून ते पंक्चर केले हाेते.

चाहत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मुसेवाला यांच्या हत्येमुळे त्यांचे चाहते अतिशय व्यथित झाले आहेत. त्यातूनच माेहाली येथे एका १७ वर्षीय चाहत्याने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले.

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाPunjabपंजाबPoliceपोलिस