भू-संपादन समितीस पुन्हा मुदतवाढ
By Admin | Updated: July 22, 2015 23:48 IST2015-07-22T23:48:13+5:302015-07-22T23:48:13+5:30
वादग्रस्त भूसंपादन विधेयकाशी संबंधित विविध पैलूंची समीक्षा करण्यासाठी गठित संसदीय संयुक्त समितीस आपला अहवाल सादर करण्यासाठी

भू-संपादन समितीस पुन्हा मुदतवाढ
नवी दिल्ली : वादग्रस्त भूसंपादन विधेयकाशी संबंधित विविध पैलूंची समीक्षा करण्यासाठी गठित संसदीय संयुक्त समितीस आपला अहवाल सादर करण्यासाठी पुन्हा एकदा ३ आॅगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
बुधवारी लोकसभेत समितीचे अध्यक्ष एस.एस. अहलुवालिया यांनी मुदवाढीबाबतचा प्रस्ताव ठेवला. सभागृहात ललित मोदी प्रकरणावर सुरूअसलेल्या गोंधळादरम्यान हा प्रस्ताव आवाजी मतांनी मंजूर करण्यात आला.
चालू अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या समितीला आपला अहवाल सादर करायचा होता.
(लोकमत न्यूज नेटवर्क)