शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
3
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
4
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
5
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
6
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
7
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
8
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
9
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
10
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
11
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
12
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
13
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
14
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
15
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
16
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
17
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
18
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
19
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...

By बाळकृष्ण परब | Updated: October 15, 2020 17:15 IST

Mohan Bhagwat statement on reservation News : देशाला पुढे नेण्यासाठी समाजातील विषमता मिटवावी लागेल. त्यासाठी समतेचे समर्थक असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन जाताना मनातील भावामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

ठळक मुद्देआरक्षणासाठीसुद्धा कायदे झाले आहेत. मात्र त्याचा लाभ सर्वांना मिळू शकत नाही ज्यांचे जिथे वर्चस्व आहे. तेच आरक्षणाचा लाभ घेत आहेतसमाजामध्ये जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत आरक्षण लागू राहिले पाहिजे

पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज आरक्षणाबाबत मोठे आणि महत्त्वपूर्ण विधान केले आहे. देशाला पुढे नेण्यासाठी समाजातील विषमता मिटवावी लागेल. त्यासाठी समतेचे समर्थक असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन जाताना मनातील भावामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आरक्षणासाठीसुद्धा कायदे झाले आहेत. मात्र त्याचा लाभ सर्वांना मिळू शकत नाही आहे. ज्यांचे जिथे वर्चस्व आहे. तेच आरक्षणाचा लाभ घेत आहेत. मात्र समाजामध्ये जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत आरक्षण लागू राहिले पाहिजे. आरक्षणाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे.पुण्यात झालेल्या दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समारंभात सामाजित समरसता या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत आपले विचार मांडताना सरसंघचालकांनी हे विधान केले. मोहन भागवत यांनी सांगितले की, सामाजिक समरसतेसाठी आपल्या आचरणामध्ये बदल घडवून आणला पाहिजे. हे आपल्याला करून दाखवावे लागेल. देश व्यापणारी विषमता उखडून टाकण्यासाठी समाजात परिवर्तन घडवून आणावे लागेल.सरसंघचालक म्हणाले की, ज्या लोकांना देशाचे तुकडे करायचे आहेत त्यांना समाजात ऐक्य प्रस्थापित होणे सहन होणार नाही. क्रांतीच्या मार्गाने समाजात समरसता आणता येणार नाही. घटनात्मक मार्गानेच समाजातील समस्यांवर तोडगा काढणे शक्य आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते.समतेशिवाय समरसता प्रस्थापित होणे शक्य नाही. त्यासाठी आपल्याला तयार राहिले पाहिजे. त्यासाठी झुकावे लागले तरी मी मागे हटणार नाही. जे वरच्या स्तरावर आहेत त्यांना झुकावे लागेल आणि जे खाली आहेत त्यांना हात पुढे करावा लागेल, तेव्हाच समाजाचा उद्धार होईल, असे सरसंघचालकांनी सांगितले.समाजात समरसता आणण्यासाठी आपल्या आचरणाचे उदाहरण लोकांसमोर ठेवावे लागेल. आधी करून नंतर दुसऱ्याला सांगावे लागेल. संघाचे स्वयंसेवक हे काम करत आहेत. सामाजिक समरसता मंचच्या लोकांनाही हे काम करावे लागेल. आपण सर्वांनी मिळून मिसळून सण, उत्सव साजरे केले पाहिजेत. आपली भाषा सुधारली पाहिजे. न्यायाच्या बाजूने उठणाऱ्या आवाजाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.दरम्यान, संपूर्ण समाज आपला आहे हा भाव घेऊन काम केले पाहिजे. मात्र काम करायचे आहे. घटनेची प्रस्तावना सर्वांच्या आचरणात यावी यासाठी वाणीचा दिवा पेटवून समरसता लोकांच्या हृदयात उतरवली पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघreservationआरक्षणIndiaभारतPoliticsराजकारण