आरक्षण संपुष्टात आणावे - आरएसएस
By Admin | Updated: January 21, 2017 06:05 IST2017-01-21T06:05:29+5:302017-01-21T06:05:29+5:30
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा आरक्षणाला विरोध दर्शविला

आरक्षण संपुष्टात आणावे - आरएसएस
जयपूर : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा आरक्षणाला विरोध दर्शविला असून, आरक्षण देशाला फुटीरतेकडे घेऊन जाईल, असे म्हटले आहे.
संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी आरक्षण संपुष्टात आणले पाहिजे, असे विधान जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये केले. आरक्षण पूर्णत: रद्द करून, सर्वांना समान संधी आणि शिक्षण मिळणारी व्यवस्था आणायला हवी. कुठल्याही देशात आरक्षण व्यवस्था स्थायी राहणे चांगली बाब नाही. या वक्तव्यावरून वाद निर्माण होऊन वातावरण तापताच, वैद्य यांनी घूमजाव केले. (वृत्तसंस्था)