शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के, बिहारमध्ये प्रस्ताव एकमताने मंजूर, भाजपसह विरोधकांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 07:30 IST

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळाने दोन दिवसांपूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली होती. 

- एस. पी. सिन्हापाटणा : बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा आता ७५ टक्क्यांवर पोहोचली आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी प्रचंड गदारोळात आरक्षणाची व्याप्ती वाढविणारे विधेयक विधानसभा सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळाने दोन दिवसांपूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली होती. 

मंत्री विजय चौधरी यांनी विधानसभेत आरक्षण मर्यादा वाढीचे विधेयक मांडले. सध्याचे ५० टक्के आरक्षण वाढवून आता ६५ टक्के केले आहे. ईबीसी (अतिमागास वर्ग) साठीचे १० टक्के आरक्षण धरून ही मर्यादा कमाल ७५ टक्क्यांवर पोहोचली आहे. विधेयकाला सत्ताधारी आघाडी जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, डावे व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. या कायद्यानुसार ६५ टक्के आरक्षण दिले जाऊ शकते. 

उच्चवर्णीय गरिबांसाठी १०% आरक्षण कायम उच्चवर्णीय गरिबांसाठी १० टक्के आरक्षण कायम राहील, असे नितीशकुमार म्हणाले. मागासवर्गीय महिलांना दिलेले तीन टक्के आरक्षण मागासवर्गीयांसाठी आधीच जारी केलेल्या आरक्षणात समायोजित केले जाईल. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे, हे तुम्ही केंद्राला सांगा, असे नितीश भाजप सदस्यांना उद्देशून म्हणाले.

केंद्राने जातगणना करावी : नितीशकुमारप्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एकूण आरक्षण समजावून सांगत केंद्र सरकारनेही जात जनगणना करावी, तसेच गरज भासल्यास आरक्षण वाढवावे. हे आरक्षण तातडीने लागू करावे, अशी मागणी केली. 

असे वाढले आरक्षण...

प्रवर्ग     आधीचे     आताचे अनुसूचित जाती-जमाती     १६%     २०%अनुसूचित जमाती     १%     २%ईबीसी आणि ओबीसी     ३०%    ४३%     ईडब्ल्यूएस/महिला    १३%     १०%एकूण     ६०%    ७५%

ईबीसी (एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लासेस) ओबीसी (इतर मागास वर्ग) ईडब्ल्यूएस (इकानाॅमिकली वीकर सेक्शन)

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमार