खासगीसह न्यायपालिकेतही हवे आरक्षण

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:25+5:302015-03-14T23:45:25+5:30

खासगीसह न्यायपालिकेतही हवे आरक्षण

Reservation in the judiciary with private privacy | खासगीसह न्यायपालिकेतही हवे आरक्षण

खासगीसह न्यायपालिकेतही हवे आरक्षण

सगीसह न्यायपालिकेतही हवे आरक्षण
राज्यव्यापी कार्यकर्ता मेळावा- रामविलास पासवान यांची मागणी
नागपूर -
अनुसूचित जाती-जमातींना खासगी क्षेत्रासह न्यायपालिकेतही आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी दलित सेनेचे संस्थापक, लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी येथे केली.
दलित सेनेतर्फे शनिवारी दुपारी प्रगती भवन छत्रपती चौक वर्धा रोड येथे राज्यव्यापी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी दलित सेनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सूर्यमणी भिवगडे, शमीम हवा, राष्ट्रीय महासचिव अनिल तायडे, प्रदेश अध्यक्ष सुनील यादव, राज फुले, विनोद टिकले, विनायक मोहोड, प्रमोद सहारे व्यासपीठावर हजर होते.
रामविलास पासवान म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आमचे राजकारण आहे. दलित, अल्पसंख्याक हा आमचा परिवार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना आम्ही प्रामुख्याने प्राधान्य देणार आहोत. आरक्षणाच्या मागणीसह दलित-आदिवासींच्या स्पेशल कम्पोनंट प्लॅनची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली. दलितांच्या प्रश्नांसाठी नॅशनल दलित फ्रंट अंतर्गत दिल्लीत एक भव्य रॅली काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दलित, लोजपा, व दलित सेनेच्या सर्व शाखांचे वेगवेगळे मेळावे आयोजित करून पक्षाला मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. विकासाचा मुद्दा लावून धरीत पक्षाला मजबुत करावे व त्यासोबतच आपण एनडीएचे घटक असल्याने एनडीएलासुद्धा मजबूत करा, असे आवाहनसुद्धा पासवान यांनी केले.
सूर्यमणी भिवगडे यांनी दलित सेनेतर्फे येत्या काळात मुस्लीम आरक्षण, शिष्यवृत्ती घोटाळा, एससी-एसटी स्पेशन कम्पोनंट प्लॅनची अंमलबजावणी याविषयावर कालबद्ध आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच यासंबंधीचा ठरावसुद्धा पारित करण्यात आला. शमीम हवा, अनिल तायडे यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी ओबीसी आरक्षण संघर्ष समितीसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पासवान यांचे स्वागत करून मागणीचे निवेदन सादर केले. राज फुले यांनी प्रास्ताविक केले. सुनील यादव यांनी संचालन केले.
बॉक्स..
गडकरी विकासाची दृष्टी असलेले नेते
नितीन गडकरी हे विकासाची दृष्टी असलेले देशातील एक ज्येष्ठ नेते आहेत, असे गौरवोद्गार रामविलास पासवान यांनी यावेळी काढले. येत्या बिहारच्या निवडणुकीमध्ये एनडीएचीच सत्ता येणार असून लोजपा हा सर्वात मोठा पक्ष राहील. त्यानंतर महाराष्ट्रावरही लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Reservation in the judiciary with private privacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.