शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एएन-32 अपघात: बचाव दलाची हवाई दलाकडून सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 08:23 IST

17 दिवसांपासून अडकलेल्या बचाव दलातील सर्वजण सुखरुप

इटानगर: हवाई दलाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा शोध घेताना अडकून पडलेल्या बचाव दलातील 15 जणांची हवाई दलानं सुखरुप सुटका केली आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यानं याबद्दलची माहिती दिली आहे. हवाई दलाच्या एएन-32 विमानाला 3 जून रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये अपघात झाला. यामध्ये विमानातील सर्व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त विमानातील कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी बचाव दल दुर्घटनास्थळी पोहोचलं होतं. मात्र या अपघातात विमानातील सर्वच जण मृत्यूमुखी पडले. त्यामुळे बचाव दलानं सर्व कर्मचाऱ्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. मात्र यानंतर बचाव दल घटनास्थळी अडकून पडलं. यामध्ये हवाई दलाच्या 8, लष्कराच्या 4 कर्मचाऱ्यांचा आणि 3 सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता. या सर्वांची शनिवारी एएलएच आणि एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं सुखरुप सुटका करण्यात आली. शिलाँगमधील हवाई दलाचे प्रवक्ते विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी ही माहिती दिली. बचाव पथकातील सर्वांची सुटका करण्यास आली असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सिंह यांनी सांगितलं. 'वातावरण खराब असल्यानं बचाव पथकाला दुर्घटना स्थळावरुन निघण्यास उशीर झाला. शनिवारी वातावरणात थोडी सुधारणा झाली. मात्र तरीही धोका कायम होता. यानंतर बचाव दलाच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आली,' अशी माहिती सिंह यांनी दिली. अपघातग्रस्त विमानातील हवाई दलाच्या 13 कर्मचाऱ्यांचे मृतदेह आणि विमानातील ब्लॅक बॉक्स आणण्यासाठी बचाव दल घटनास्थळी पोहोचलं होतं. सियांग जिल्ह्यातील डोंगराळ भागातून मृतदेह बाहेर काढण्याचं काम 20 जूनला पूर्ण झालं. आसामच्या जोरहाटमधून 3 जूनला एएन 32 विमानानं उड्डाण केलं होतं. मात्र उड्डाणानंतर अवघ्या 33 मिनिटांमध्येच हे विमान बेपत्ता झालं.  

टॅग्स :Accidentअपघातindian air forceभारतीय हवाई दल