मनसेचे वनमंत्र्यांना निवेदन

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:32+5:302015-07-10T23:13:32+5:30

Request to MNS Forests | मनसेचे वनमंत्र्यांना निवेदन

मनसेचे वनमंत्र्यांना निवेदन

>नागपूर : वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे होणाऱ्या नुकसानीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागणीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत गडकरी यांनी राज्याचे वनमंत्री व विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे. गडकरी यांच्या मते, वन्यप्राणी दरवर्षी जंगलाशेजारच्या शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात. याचा शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसतो. विशेष म्हणजे, विदर्भातील शेतकरी अगोदरच दृष्काळ, अतिवृष्टी व गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटाचा सामाना करीत आहे. यात वन्यप्राणी पुन्हा त्यांच्या पिकांची नासाडी करीत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी वन विभागाच्या जमिनींना कायमस्वरू पी कुंपण करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रश्नांवर अलीक डेच वन अधिकाऱ्यांशी एक बैठक झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सतीश कोल्हे, घनश्याम निखाडे, शांताराम ढोके, प्रमोद ढोले, जय चव्हाण, राजूभाउ ठोंबरे व मनीष साखरकर उपस्थित होते.
.....

Web Title: Request to MNS Forests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.