शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या विनंतीवरून अ‍ॅपलने दिली २७ युजर्सची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 06:53 IST

कम्प्युटर डेटाची हेरगिरी करण्यावरून भारतात गदारोळ उठला असतानाच आपण आपल्या युजर्सचा डेटा विविध देशांच्या सरकारी यंत्रणांना दिला असल्याची माहिती अ‍ॅपल कंपनीने दिली आहे.

नवी दिल्ली : कम्प्युटर डेटाची हेरगिरी करण्यावरून भारतात गदारोळ उठला असतानाच आपण आपल्या युजर्सचा डेटा विविध देशांच्या सरकारी यंत्रणांना दिला असल्याची माहिती अ‍ॅपल कंपनीने दिली आहे. त्यामध्ये भारतातील २७ युजर्सचा समावेश आहे. सरकारी यंत्रणांच्या विनंतीवरून आम्ही तो डेटा शेअर केला, असा दावा अ‍ॅपलने केला आहे. आयफोन बनविणाऱ्या अ‍ॅपल कंपनीने याबाबत एक अहवाल शेअर केला आहे. या अहवालानुसार, २०१८ च्या सहा महिन्यात अ‍ॅपलने जवळपास २५ हजार वेळेस सरकारकडून आलेल्या अर्जानंतर त्यांना कस्टमर डेटाचा अ‍ॅक्सेस दिला आहे. कंपनीने सांगितले की, जगभरातील विविध सरकारांकडून जवळपास ३२,३४२ वेळा मागणी आली. त्यांनी १,१६,८२३ वेळा डिव्हाइसचा अ‍ॅक्सेस मागितला होता. यात ८० टक्के मागण्या पूर्ण करण्यात आल्या. अ‍ॅपलने सांगितले की, ज्या रिक्वेस्टचा हेतू प्रामाणिक नाही त्या रिक्वेस्ट नाकारल्या जातात. अथवा, कायदेशीररित्या ज्या रिक्वेस्ट योग्य नाहीत त्यालाही नकार दिला जातो. अहवाल जाहीर करताना अ‍ॅपलने स्पष्ट केले आहे की, आपले स्वातंत्र्य, खासगीपणा याबाबत आम्ही प्रतिबद्ध आहोत. आवश्यक त्या ठिकाणीच सरकारांना माहिती दिली असून त्यासाठी आकडेवारी समोर ठेवण्यात आली आहे.सर्वाधिक अर्ज जर्मनीतूनसर्वाधिक अर्ज जर्मनीतून आले आहेत. एकूण रिक्वेस्टपैकी ४२ टक्के जर्मनीच्या आहेत. यातील बहुतांश मागणी चोरी झालेल्या डिव्हाइसच्या तपासासाठी मागितली होती. अमेरिकेकडून आलेल्या रिक्वेस्टची संख्या ४,५७० होती. यात १४,९११ डिव्हाइसची माहिती मागण्यात आली होती.यात ९१८ प्रकरणे घोटाळेबाजांना पकडण्यासाठी होती. तर, यूकेकडून अ‍ॅपलला २,६०६ डिव्हाइससाठी ५७२ रिक्वेस्ट आल्या होत्या. यात ७७% रिक्वेस्ट स्वीकारल्या.

टॅग्स :Indiaभारत