सेवानिवृत्त वन कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:08+5:302015-02-13T00:38:08+5:30

सेवानिवृत्त वन कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Request to Chief Minister of Retired Forest Workers | सेवानिवृत्त वन कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सेवानिवृत्त वन कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वानिवृत्त वन कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
नागपूर : महाराष्ट्र वन सेवानिवृत्त (पेन्शनर्स) असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सवलती द्याव्यात, जीवनात एकदा शासकीय दराने लाकडे मिळावीत, पाल्यांना योग्यतेनुसार नोकरी, मुख्यमंत्र्यांचे मिनी कार्यालय नागपुरात सुरू करावे, कालबद्ध पदोन्नतीचा चुकीचा जीआर रद्द करावा, नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांकडून शासकीय वसुली थांबवावी, सेवानिवृत्त ज्येष्ठ वनपालांवर पदोन्नतीबाबतचा अन्याय दूर करावा आदी मागण्या करण्यात आल्या. शिष्टमंडळात चंद्रकांत चिमोटे, विनोद देशमुख, एम. ए. अकील, आर. बी. पोतेवार, आर. पी. दाढे, सी. एच. मानापुरे, संभाजी आसोले, एस. डब्ल्यू. राजूरकर यांचा समावेश होता.

Web Title: Request to Chief Minister of Retired Forest Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.