शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Republic Day: या मंदिरात आज साजरा केला जातोय प्रजासत्ताक दिन, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 10:25 IST

Republic Day: संपूर्ण देशात 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. पण, या मंदिरात 9 फेब्रुवारीला साजरा केला जात आहे.

उज्जैन: 26 जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जातो, परंतु देशात एक मंदिर आहे जिथे आज म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. उज्जैनच्या बडा गणेश मंदिरात आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. जाणून घ्या यामागचे कारण.

आज प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?उज्जैनच्या बडा गणेश मंदिरात राष्ट्रीय सण इंग्रजी कॅलेंडरनुसार साजरे केले जात नाहीत, तर हिंदू कॅलेंडरच्या तारखेनुसार साजरे केले जातात. त्यामुळे या मंदिरात आज म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी तिथीप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.

अष्टमी तिथीला साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन26 जानेवारी 1950 रोजी भारतात प्रजासत्ताकची स्थापना झाली होती. त्या दिवशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी होती. त्यामुळे दरवर्षी उज्जैनच्या बडा गणेश मंदिरात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. उज्जैनचे बडा गणेश मंदिर हे देशातील एकमेव असे मंदिर आहे जिथे हिंदू दिनदर्शिकेनुसार सर्व राष्ट्रीय सण आणि उपवास साजरे केले जातात.

10 फूट उंच राष्ट्रध्वज फडकवला जातोआज (9 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता गणेश मंदिरात प्रजासत्ताक अखंडतेसाठी आणि राष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी देवाची पंचामृत अभिषेक-पूजा करण्यात येणार आहे. दुपारी 12.30 वाजता अक्षय कलशाची स्थापना करण्यात येणार असून 10 फूट उंच राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे.

समृद्ध देशासाठी प्रार्थना होईलपंडित आनंद शंकर व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त मंदिरात गणपतीला दुर्वा आणि लाल फुले अर्पण करून कोरोना संकट निवारणासाठी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करण्यात येणार आहे. याशिवाय भाविक मंदिरात येऊन देशात सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करू शकतात.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनujjain-pcउज्जैनTempleमंदिर