शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

केवळ 45000 लोकांना मिळणार प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 08:38 IST

Republic Day Parade : अलीकडच्या काळात कोरोनाच्या संसर्गाची चिंता वाढली होती, परंतु सरकारने त्यावर कोणतेही कठोर नियम लागू केले नाहीत.

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मोठे बदल करण्यात आले आहेत. या विशेष प्रसंगी केंद्राने पाहुण्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता केवळ 45000 प्रेक्षक प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला पोहोचू शकतील, जिथे पूर्वी दरवर्षी एक लाख 25 हजार प्रेक्षकांना कर्तव्य पथावर आमंत्रित केले जात होते. केवळ कोरोनाच्या काळात 25 हजार प्रेक्षक कर्त्यव पथावर पोहोचू शकले. अलीकडच्या काळात कोरोनाच्या संसर्गाची चिंता वाढली होती, परंतु सरकारने त्यावर कोणतेही कठोर नियम लागू केले नाहीत.

दरम्यान, 32,000 तिकिटे ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असतील आणि 12,000 ई-निमंत्रण कार्ड जारी केले जातील. मात्र, काही फिजिकल तिकिटे देखील लोकांना दिली जातील. यावेळी व्हीव्हीआयपी निमंत्रण पत्रिकांची संख्या कमी करण्यात आली आहे. पूर्वी ते 50,000-60,000 पेक्षा जास्त असायचे ते आता 12,000 पर्यंत कमी झाले आहे. सर्वसामान्यांच्या संख्येत कोणतीही घट नाही.

इजिप्तचे राष्ट्रपती सोहळ्याचे प्रमुख पाहुणेइजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह एल सिसी हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. इजिप्तची 120 सदस्यांची तुकडी पहिल्यांदाच कर्तव्य पथावर कूच करणार आहे. बीटिंग द रिट्रीट समारंभासाठी एकूण जागांपैकी 10 टक्के जागा सामान्य लोकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, ज्यांची संख्या 1,250 आहे. यावर्षी 16 राज्ये आणि सहा केंद्रीय मंत्रालयांची झलक दाखवण्यात येणार आहे. यावेळच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची थीम जन भागिदारीचा विषय आहे, म्हणजे अधिकाधिक लोकांचा सहभाग आणि त्यानुसार सर्व काही आयोजित करण्यात आले आहे.

सेंट्रल व्हिस्टाच्या कामगारांवर विशेष लक्षसेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील कामगार आणि त्यांचे कुटुंबीय, कर्तव्य पथचे मेंटेनन्स कामगार, दूध बूथ विक्रेते, भाजी विक्रेते आणि छोटे किराणा विक्रेते या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित असतील. त्यांना उजवीकडे पुढच्या रांगेत बसवले जाईल. याचबरोबर, प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी वैध तिकीट किंवा निमंत्रण पत्रिका असलेल्या प्रेक्षकांना मेट्रो स्टेशनपासून परेडच्या ठिकाणी सहज जाण्याची व्यवस्था सरकार करेल. तसेच, या वेळी 23 जानेवारीपासून स्वातंत्र्य सैनिक सुभाषचंद्र बोस यांच्या वाढदिवसानिमित्त लष्करी टॅटू आणि आदिवासी नृत्यांसह या उत्सवाची सुरुवात होईल. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर दोन दिवस हे आयोजन होणार आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रममिलिटरी टॅटू आणि ट्रायबल डान्समध्ये हॉर्स शो, खुकरी डान्स, गडका, मल्लखांब, कलारीपयट्टू, थंगाटा, मोटरसायकल डिस्प्ले, एअर वॉरियर ड्रिल टीम, नेव्ही बँड, पॅन मोटर आणि हॉट एअर बलून असे कार्यक्रम होणार आहेत. देशभरातून एकूण 20 प्रकारचे आदिवासी समूह येतील, जे कार्यक्रमादरम्यान "आदि शौर्य" चे प्रतिनिधित्व करणारे आदिवासी नृत्य सादर करतील. यासोबतच बॉलिवूड गायक कैलाश खेर देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. परेड पाहण्यासाठी 19 देशांतील 198 परदेशी कॅडेट्सना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये 32 अधिकारी आणि 166 कॅडेट्सचा समावेश आहे जे 27 जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या NCC रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.

परेड दरम्यान मेक-इन-इंडियाचा जलवाआत्मनिर्भर भारत उपक्रमावर लक्ष केंद्रित करून, मेक-इन-इंडियाची काही उत्पादने परेड दरम्यान प्रदर्शित केली जातील. यामध्ये मेन बॅटल टँक, एनएजी मिसाइल सिस्टीम, के 9 वज्र, ब्रह्मोस, आकाश मिसाईल, अँडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे. गतवर्षीप्रमाणेच बीटिंग द रिट्रीट सोहळ्यादरम्यान ड्रोन शोचे आयोजन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनNew Delhiनवी दिल्ली