शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस पदकाने सन्मानित होणार '12th Fail'चे IPS मनोज शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 21:28 IST

भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील 1 हजाराहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना विविध श्रेणीतील शौर्य आणि सेवा पदके देऊन गौरविण्यात येणार आहे.

Republic Day 2024: भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील 1 हजाराहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना विविध श्रेणीतील शौर्य आणि सेवा पदके देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस, अग्निशमन सेवा, होमगार्ड आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवा या विभागातील एकूण 1,132 जवानांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा यांचाही यादरम्यान गौरव होणार आहे. मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर "12वी फेल" हा हिंदी चित्रपट बनला आहे. 

केंद्रीय गृह मंत्रालयाने एका निवेदनात याबाबत माहिती दिली. 2005 च्या महाराष्ट्र केडरचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी मनोज कुमार शर्मा, त्यांचे बिहार केडरचे बॅचमेट जितेंद्र राणा आणि इतर काही जणांना गुणवंत सेवा पदक (MSM)देण्यात आले आहे. मनोज शर्मा आणि राणा, दोघेही CISF मध्ये प्रतिनियुक्तीवर असून, एव्हिएशन सिक्युरिटी विंग (ASG) मध्ये तैनात आहेत. दोन्ही अधिकारी अनुक्रमे मुख्य विमानतळ सुरक्षा अधिकारी (CASOs) म्हणून मुंबई आणि दिल्ली विमानतळावरील CISF युनिटचे प्रमुख आहेत.

राष्ट्रपतींचे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाच्या नावे संबोधनभारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी संध्याकाळी देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी श्रीराम मंदिराचा उल्लेख केला आणि कर्पूरी ठाकूर यांनाही श्रद्धांजली वाहिली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आपल्या प्रजासत्ताकाचे 75 वे वर्ष अनेक अर्थाने देशाच्या वाटचालीतील ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. आपला देश स्वातंत्र्याच्या शतकाकडे वाटचाल करत आहे आणि अमृत कालच्या सुरुवातीच्या टप्प्यातून जात आहे. हा कालखंडातील परिवर्तनाचा काळ आहे. 

भाषणात श्रीराम मंदिराचा उल्लेखयावेळी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांनी आपल्या भाषणात राम मंदिराचा उल्लेख केला. राष्ट्रपती  मुर्मू म्हणाल्या की, अयोध्येतील भगवान श्री राम जन्मस्थानी उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात स्थापन झालेल्या मूर्तीच्या अभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा आपण सर्वांनी पाहिला आहे, भविष्यात या घटनेला व्यापक परिप्रेक्ष्यातून पाहिले जाईल, तेव्हा इतिहासकारांना भारताची आठवण होईल.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२४PoliceपोलिसMumbaiमुंबईDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूPresidentराष्ट्राध्यक्ष