शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

Republic Day 2022: राफेल उडवणारी पहिली महिला वैमानिक शिवांगी सिंह, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 14:55 IST

Republic Day 2022: गेल्या वर्षी फ्लाइट लेफ्टनंट भावना कंठ या भारतीय वायू दलाच्या चित्ररथाचा भाग असणाऱ्या देशातील पहिल्या महिला वैमानिक होत्या.

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनात भारतीय वायू दलाच्या चित्ररथाचा समावेश होता. यामध्ये राफेल उडवणारी देशातील पहिली महिला वैमानिक शिवांगी सिंह देखील सहभागी झाल्या होत्या. शिवांगी सिंह या भारतीय वायू दलाच्या चित्ररथाचा भाग असणाऱ्या दुसरी महिला फायटर पायलट आहेत. गेल्या वर्षी फ्लाइट लेफ्टनंट भावना कंठ या भारतीय वायू दलाच्या चित्ररथाचा भाग असणाऱ्या देशातील पहिल्या महिला वैमानिक होत्या.

वाराणसीमध्ये राहणाऱ्या शिवांगी सिंह या 2017 मध्ये भारतीय वायू दलात रुजू झाल्या होत्या. त्या वायू दलाच्या महिला लढाऊ विमानाच्या वैमानिकांच्या दुसऱ्या तुकडीचा भाग बनल्या. राफेल उड्डाण करण्यापूर्वी त्यांनी मिग-21 बायसन विमानांचे उड्डाण केले आहे. शिवांगी सिंह या पंजाबमधील अंबाला येथील भारतीय वायू दलाच्या गोल्डन एरोज स्क्वाड्रनमधील आहेत.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनात 'भारतीय वायुसेना, भविष्यासाठी बदल' असे वायू दलाच्या चित्ररथाचे शीर्षक होते. यावेळी मिग-21, जी-नेट, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आणि आश्लेषा रडारसह राफेल विमानांचे स्केल डाउन मॉडेल्स देखील या चित्ररथात दाखवण्यात आले. राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी 29 जुलै 2020 रोजी भारतात पोहोचली. फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या 36 लढाऊ विमानांपैकी आतापर्यंत 32 राफेल विमाने देशात आणली आहे. या वर्षी एप्रिलपर्यंत इतर चार राफेल विमाने भारतात आणली जाऊ शकतात.

मार्चिंग पथकया वर्षी लष्कर आणि केंद्रीय निमलष्करी दलाच्या तिन्ही शाखांच्या मार्चिंग तुकड्यांनी राजपथावर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्यासह सर्व मान्यवरांसमोर संचलन केले. यंदाच्या संचलनमध्ये सैन्याच्या 61 घोडदळ रेजिमेंटसह एकूण सहा मार्चिंग तुकड्या आहेत. ज्यामध्ये राजपूत रेजिमेंट, आसाम जॅकलाई, सिखलाई, AOC आणि पॅरा रेजिमेंट यांचा समावेश आहे. याशिवाय हवाई दल, नौदल, सीआरपीएफ, एसएसबी, दिल्ली पोलीस, एनसीसी आणि एनएसएसचे मार्चिंग टीम आणि बँड राजपथावर दिसतील. दरवर्षीप्रमाणे याही परेडमध्ये बीएसएफचे उंट पथक सहभागी होते. 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनindian navyभारतीय नौदल