शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

प्रजासत्ताकदिनी विरोधकांचे संविधान बचाव आंदोलन!, शरद पवार, फारुक अब्दुल्ला, शरद यादव होणार सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 11:45 IST

वूई द पीपल आॅफ इंडिया..! ही आपल्या संविधानातली पहिली ओळ. त्याचाच आधार घेत देशभरातील समविचारी नेत्यांनी ‘संविधान बचाव आंदोलन’ मोहीम हाती घेतली आहे.

मुंबई : वूई द पीपल आॅफ इंडिया..! ही आपल्या संविधानातली पहिली ओळ. त्याचाच आधार घेत देशभरातील समविचारी नेत्यांनी ‘संविधान बचाव आंदोलन’ मोहीम हाती घेतली आहे. २६ जानेवारीला मंत्रालयाजवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून गेट वे आॅफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मूक रॅली काढून विद्यमान सरकारच्या विरोधात असंतोषाला वाट मोकळी करून देण्याची सुरुवात यानिमित्ताने केली जाईल.

रॅलीत देशाचा तिरंगा झेंडा फक्त प्रत्येकाच्या हाती असेल. कोणत्याही घोषणा दिल्या जाणार नाहीत किंवा हजारोंची गर्दी जमवून ताकद दाखविण्याचाही मानस नसून संविधानाची गळचेपी रोखणे, व्यक्तिस्वातंत्र्यावरील घाला थांबवणे हा त्यामागे हेतू आहे. मात्र यानिमित्ताने केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी पक्षीय झेंडे बाजूला सारून एकत्र आणण्याचा प्रयत्न पडद्याआडून काही बडी राजकीय नेतेमंडळी करू पाहत आहेत. ही रॅली यशस्वी झाल्यानंतर कोलकाता, बंगळुरू, लखनऊ, पाटणा, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, तिरुअनंतपुरम या प्रमुख शहरांमध्येही हे आंदोलन होईल.

कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर न घेता सर्वपक्षीय नेते, विचारवंत, सामाजिक क्षेत्रातील लोक एकत्र आणायचे आणि सरकारच्या विरोधातील असंतोष एकत्र करायचा, असा यामागे हेतू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, ज्येष्ठ नेते शरद यादव, माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, गुजरातेत उदयाला आलेले नवे नेतृत्व हार्दिक पटेल, खा. राजू शेट्टी, सीताराम येचुरी, योगेंद्र यादव, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. राजीव सातव, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, गणेश देवी, वनराज वंजारी अशा अनेकांनी २६ तारखेला मुंबईत येण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती संविधान बचाव आंदोलन समितीचे सदस्य अभिषेक देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.समविचारी लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्नदेशपांडे म्हणाले, कॉ. गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमाताई पानसरे, नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र हमीद दाभोलकर हेसुद्धा सहभागी होतील. आ. जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर, प्रकाश रेड्डी, डॉ. भालचंद्र कांगो, पुरुषोत्तम खेडेकर, न्या. पी. बी. सावंत, शेकापचे जयंत पाटील यांनीही सहभागी होणार असल्याचे कळविले आहे.सामाजिक, आर्थिक, नाट्य, कला, साहित्य अशा विविध क्षेत्रांतील समविचारी लोक एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarooq Abdullahफारुख अब्दुल्ला