मुख्याधिकारी संघटनेतर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन

By Admin | Updated: February 5, 2016 00:34 IST2016-02-05T00:34:06+5:302016-02-05T00:34:06+5:30

जळगाव : यावल नगरपालिकेतर्फे शहरातील अतिक्रमण काढत असताना मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटविण्याचा प्रयत्न झाला. यापूर्वीदेखील मुख्याधिकार्‍यांवर हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटनेतर्फे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना गुरुवारी देण्यात आले. कर्तव्य बजावत असताना मुख्याधिकारी यांच्यावर राजकीय व्यक्ती तसेच समाजकंटक हे वारंवार हल्ला करण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा घटनांना प्रतिबंध घालावा यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर जिल्हा प्रशासन अधिकारी अनिकेत मानोरकर, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, प्रभाकर सोनवणे, रवींद्र जाधव, अमोल बागुल, प्रशांत सरोदे, शोभा बाविस्कर, सोमनाथ आढाव, किरण देशमुख, सपना वसावा, राहुल पाटील, सचिन माने

Representation to the Divisional Commissioner | मुख्याधिकारी संघटनेतर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन

मुख्याधिकारी संघटनेतर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन

गाव : यावल नगरपालिकेतर्फे शहरातील अतिक्रमण काढत असताना मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटविण्याचा प्रयत्न झाला. यापूर्वीदेखील मुख्याधिकार्‍यांवर हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटनेतर्फे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना गुरुवारी देण्यात आले. कर्तव्य बजावत असताना मुख्याधिकारी यांच्यावर राजकीय व्यक्ती तसेच समाजकंटक हे वारंवार हल्ला करण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा घटनांना प्रतिबंध घालावा यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर जिल्हा प्रशासन अधिकारी अनिकेत मानोरकर, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, प्रभाकर सोनवणे, रवींद्र जाधव, अमोल बागुल, प्रशांत सरोदे, शोभा बाविस्कर, सोमनाथ आढाव, किरण देशमुख, सपना वसावा, राहुल पाटील, सचिन माने यांच्या स‘ा आहेत.

अग्रवाल संघटनेतर्फे २१ रोजी परिचय संमेलन
जळगाव : जळगाव जिल्हा अग्रवाल संघटनेतर्फे रविवार २१ रोजी दुपारी तीन ते पाच यावेळेत अग्रवाल कम्युनिटी हॉल, सागर पार्क येथे बायोडाटा परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजबांधवानी विवाह योग्य युवक व युवतींचा बायोडाटा २३, सेंट्रल फुले मार्केट, पहिला माळा येथे जमा करावा असे आवाहन महामंत्री डॉ.सुरेश अग्रवाल यांनी केले आहे.

माळी महासंघाची रविवारी जिल्हा बैठक
जळगाव : महाराष्ट्र माळी समाज महासंघाची जिल्हा बैठक रविवार ७ रोजी जिल्हाध्यक्ष हिलाल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. यावेळी सामुहिक विवाह सोहळा, जिल्हा कार्यकारिणीतील फेरबदल यासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. समाजबांधवांनी उपस्थित रहावे आवाहन करण्यात आले आहे.

अवैध वृक्षतोड कायद्यासंदर्भात कार्यशाळा
जळगाव : जिल्हाभरातील वृक्षतोड रोखण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे पर्यावरण कायद्यासंदर्भात कार्यशाळा आयोजित केली आहे. रविवार ७ रोजी सकाळी १० वाजता कुसुंबा येथील आर.सी.बाफना गो-शाळा येथे होणार्‍या या कार्यशाळेत वन्यजीव संरक्षण संस्था, ऑर्कीड नेचर क्लब, युवाशक्ती फाउंडेशन या संस्था सहभागी होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन वासुदेव वाढे, रवींद्र सोनवणे, दीपक तांबोळी, बाळकृष्ण देवरे यांनी केले आहे.

Web Title: Representation to the Divisional Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.