शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भारतामध्ये फाशीची शिक्षा ठोठावण्याचे प्रमाण घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 12:30 IST

भारतामध्ये एकूण 317 लोकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.

नवी दिल्ली- भारतीय न्यायालयांकडून फाशीची शिक्षा सुनावण्यामध्ये घट होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. 2017 साली त्याआधीच्या वर्षापेक्षा फाशीच्या शिक्षा ठोठावण्यात 20 टक्के घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी भारतातील न्यायालयांनी 109 जणांना फाशीची शिक्षा ठोठावली मात्र त्यातील कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष फाशी देण्यात आलेली माही असे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने प्रसिद्ध केलेल्या माहितीत म्हटले आहे.2016 साली 136 जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती तर 2017 साली त्यात 27 ने घट झाल्याचे अॅम्नेस्टीच्या "डेथ सेनटेन्स अँड एक्झीक्युशन्स 2017" या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अॅम्नेस्टीचा हा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. गेल्यावर्षी झालेल्या फाशीच्या शिक्षांमध्ये 51 जणांना हत्या केल्याबद्दल मृत्युदंड ठोठावला गेला तर 2016 साली 87 जणांना हत्येच्या गुन्ह्यात फाशी ठोठावली गेली होती असे अॅम्नेस्टीने लंडनस्थित नॅशनल लॉ युनिवर्सिटीच्या सेंटर ऑन डेथ पेनल्टी विभागाच्या आकडेवारीच्या मदतीने स्पष्ट केले आहे.भारतामध्ये एकूण 317 लोकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. 2015 साली भारतातील आजवरची शेवटची फाशी देण्यात आली होती. याकूब मेमन याला ही फाशी देण्यात आली होती. 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता. त्या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. ही सर्व माहिती अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे वरिष्ठ संचालक तावांडा मुत्साह यांनी दिली. फाशीची शिक्षा ठोठावण्यात चीनचा नंबर सर्वात वरती असून 2018 साली फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली संख्या हजाराच्या वर आहे. मात्र नक्की संख्या स्पष्ट झालेली नाही. त्यानंतर इराणचा नंबर लागतो. इराणमध्ये 507 जणांना फाशी सुनावली गेली. सौदी अरेबियामध्ये 146, इराकमध्ये 125 तर पाकिस्तानात 60 जणांना फाशीची सुनावण्यात आलेली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयDeathमृत्यू