अभिरुची बदलल्याने दर्जेदार गीतसंगीत हरविले (भाग ३)
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:34+5:302015-01-22T00:07:34+5:30
आता माझीच गाणी मला आठवत नाहीत

अभिरुची बदलल्याने दर्जेदार गीतसंगीत हरविले (भाग ३)
आ ा माझीच गाणी मला आठवत नाहीतवेगवेगळ्या भाषांत मी आतापर्यंत अनेक गीते ऐकली. माझेच गीत मी ऐकले तर मलाही आता आठवत नाही. सध्याची नवीन गायकांची गीते ऐकायला मात्र मला वेळ मिळत नाही. ती गीते ऐकण्यासारखी आहेत असे मला वाटत नाही. सारेच नवे गायक वाईट नाहीत पण मला सारेच आवडत नाहीत. पूर्वी सिनेमातील सर्वच गीते लोकप्रिय व्हायची. आता एखादेच लोकप्रिय होते. काही वेळेला मी गायिलेली गीते चांगली असतानाही सिनेमा चालला नाही म्हणून गीते लोकप्रिय झाली नाहीत, असेही झाले आहे. तर काही वेळेला गीत लोकप्रिय झाल्याने सिनेमा चालला. दीदींनी संगीत दिले असले तरी संगीतकार खऱ्या अर्थाने हृदयनाथच आहे. -------विदेशी लोकांसह अनेक कार्यक्रमसध्या पाश्चात्त्य संगीत पसंत केले जात आहे. त्यामुळे मी पाश्चात्त्य संगीतकारांसहसुद्धा विदेशात अनेक कार्यक्रम करते आहे आणि तेथल्या रसिकांचा छान प्रतिसाद मिळतो आहे. त्यात माझी नातही माझ्यासोबत असते. मंगेशकरांचा वारसा कोण चालविणार ते सांगता येत नाही. माझी नात मात्र खूप छान गाते पण तिला फ्युजनमध्ये आवड आहे. त्यामुळे ती भविष्यात काय करेल ते काळच ठरवेल. मला दुसरे कुणी वारसा चालविणारे मात्र दिसत नाही. -----रिॲलिटी शोने गायक घडत नाहीअनेक वाहिन्यांवरच्या रिॲलिटी शो मधून चांगले गायक दिसतात. अनेकांची मी प्रशंसाही केली आहे. पण हे गायक नंतर तालीम करीत नाही. त्यानंतर थेट त्यांचे स्टेज शो सुरू होतात आणि ते संपतात. कारण स्टेज शोमुळे गळ्यावर ताण येतो आणि आवाजात बदल होतो. मी पार्श्वगायन करताना स्टेज शो फारच कमी केले आहेत. पण पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावताना गायक संपतो. गेल्या अनेक वर्षात सोनु निगम, कुणाल गांजावाला आणि श्रेया घोषाल यांच्या पलिकडे कोण समोर आले. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चांगले संबंध होते. ते फार मोठे व्यक्ती होते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाने मी प्रभावित झाले.