उत्तरेत पुन्हा पारा घसरला; थंडीची लाट कायम
By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:48+5:302015-01-15T22:32:48+5:30
नवी दिल्ली : उत्तर भारतात अनेक ठिकाणी पारा आणखी घसरला असून थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. दाट धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे.

उत्तरेत पुन्हा पारा घसरला; थंडीची लाट कायम
न ी दिल्ली : उत्तर भारतात अनेक ठिकाणी पारा आणखी घसरला असून थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. दाट धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे.उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये हिमवृष्टीनंतर किमान तापमान आणखी खाली गेले आहे. काश्मीर खोर्यातही पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. दिल्लीतील तापमान पुन्हा घसरले असून ५.८ अंश सेल्सिअसवर आले आहे. दुपारी ऊन वाढल्याने तापमानात थोडी सुधारणा झाली. उत्तर रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ६१ रेल्वे विलंबाने धावत असून पाच गाड्या रद्द करण्यात आल्या.