महात्मा गांधींशी संबंधित तीन पुस्तकांचे पुनर्प्रकाशन

By Admin | Updated: April 11, 2017 00:08 IST2017-04-11T00:08:32+5:302017-04-11T00:08:32+5:30

सत्याग्रह आंदोलनाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारने सोमवारी महात्मा गांधींशी संबंधित तीन पुस्तकांचे पुनर्प्रकाशन केले.

Repeat of three books related to Mahatma Gandhi | महात्मा गांधींशी संबंधित तीन पुस्तकांचे पुनर्प्रकाशन

महात्मा गांधींशी संबंधित तीन पुस्तकांचे पुनर्प्रकाशन

नवी दिल्ली : सत्याग्रह आंदोलनाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारने सोमवारी महात्मा गांधींशी संबंधित तीन पुस्तकांचे पुनर्प्रकाशन केले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
महात्मा गांधींशी संबंधित ज्या तीन पुस्तकांचे आज पुनर्प्रकाशन करण्यात आले त्यात डी. जी. तेंडुलकर यांचे ‘गांधी इन चंपारण’या पुस्तकाचा समावेश आहे. हे पुस्तक १९५७ मध्ये प्रकाशित झाले होते. याशिवाय ‘रोमन रोलँड अँड गांधी करस्पाँडन्स’ (१९७६) आणि आठ खंडातील गांधीजींचे चरित्र या पुस्तकांचा समावेश आहे. हे पुस्तक १९५१ मध्ये प्रकाशित झाले होते. यावेळी बोलताना व्यंकय्या नायडू यांनी गांधीजींच्या करुणा आणि अहिंसा या मूल्यांवर भर दिला. ते म्हणाले की, चंपारण सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होत असताना या निमित्ताने पुस्तकांचे प्रकाशन करताना मला अतिशय आनंद होत आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यांचे कार्य आजही लोकांना प्रेरणा देणारे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Repeat of three books related to Mahatma Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.