दमदार पावसाने पेरणीला पुन्हा जोर
By Admin | Updated: June 28, 2016 19:26 IST2016-06-28T19:20:49+5:302016-06-28T19:26:00+5:30
परिसरामध्ये दमदार पावसाने पुन्हा पेरण्यांनी जोर धरला आहे.

दमदार पावसाने पेरणीला पुन्हा जोर
करतखेडा- परिसरामध्ये दमदार पावसाने पुन्हा पेरण्यांनी जोर धरला आहे. परिसरामध्ये सोमवारी दुपारी ३ वाजता वादळी वार्यासह दमदार पाऊस पडला. तासभर पडलेल्या जोरदार पावसाने पेरणीयोग्य परिस्थीती निर्माण केल्याने खोळंबलेल्या पेरण्या पुन्हा सुरू झाल्या.
शेतकर्यांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजुक असताना निसर्ग साथ देईल, या आशेने शेतकर्यांनी रखरखत्या उन्हात पेरण्या केल्या. पाच दिवस उलटून गेल्यानंतरही पाऊस न पडल्याने पेरण्या आटोपलेल्या शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु सोमवारी दुपारी दमदार पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला असून, पेरण्या पुन्हा सुरू झाल्या. (वार्ताहर)