वढू खुर्दचा रस्ता दुरुस्त करा आंदोलन : महिलांचा सहभाग

By Admin | Updated: February 2, 2015 23:52 IST2015-02-02T23:52:57+5:302015-02-02T23:52:57+5:30

लोणीकंद : पुणे-नगर रस्ता ते वढू खुर्द गाव हा रस्ता खराब झाला असून, तातडीने दुरुस्त करावा, यासाठी रमाई महिला ब्रिगेड व झोपडप˜ीतील नागरिकांनी काही काळ रस्ता बंद आंदोलन केले़

Repair the road of Vadhu Khurd: Movement of women | वढू खुर्दचा रस्ता दुरुस्त करा आंदोलन : महिलांचा सहभाग

वढू खुर्दचा रस्ता दुरुस्त करा आंदोलन : महिलांचा सहभाग

णीकंद : पुणे-नगर रस्ता ते वढू खुर्द गाव हा रस्ता खराब झाला असून, तातडीने दुरुस्त करावा, यासाठी रमाई महिला ब्रिगेड व झोपडप˜ीतील नागरिकांनी काही काळ रस्ता बंद आंदोलन केले़
वढू खुर्दच्या नागरिकांनी यास विरोध केला़ त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला़ लोणीकंद पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने आंदोलन थांबविण्यात आले़
विजय रणस्तंभ समोरून झोपडप˜ीमधून वढू खुर्द गावाकडे रस्ता जातो़ यामध्ये अनेक खड्डे व चारी निर्माण झाली आहे़ रमाई ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष लताताई शिरसाठ म्हणाल्या, की हा रस्ता धोकादायक झाला आहे़ यामुळे अपघात होतात, तर तो तातडीने दुरुस्त करावा़ वढू खुर्दचे सरपंच सतीश थिटे म्हणाले, की हा प्रश्न पेरणे ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम अंतर्गत आहे़ यासाठी आमचा रस्ता बंद का करता़
लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये चर्चा होऊन तात्पुरते आंदोलन थांबवले़

Web Title: Repair the road of Vadhu Khurd: Movement of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.