शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रख्यात भारतीय भरतनाट्यम डान्सर अमरनाथ घोष यांची अमेरिकेत हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 10:42 IST

Amarnath Ghosh: अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा एका भारतीय व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रख्यात भरतनाट्यम डान्सर अमरनाथ घोष यांची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा एका भारतीय व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रख्यात भरतनाट्यम डान्सर अमरनाथ घोष यांची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अमरनाथ घोष हे त्यांच्या आईवडिलांचे एकुलते एक अपत्य होते. ही घटना अमेरिकेतील मिसोरीमधील सेंट लुईस येथे घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांना बेछूट गोळीबार करत अमरनाथ घोष यांना लक्ष्य केले. या हल्ल्याच्या घटनेनंतर आशियाई वंशाच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अमरनाथ घोष यांच्या हत्येची माहिती त्यांची मैत्रिण आणि अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिने दिली आहे.  

एक्सवरील एका पोस्टमध्ये देवोलिना भट्टाचार्जी हिने लिहिले की, अमरनाथ घोष याची मागच्या मंगळवारी हत्या करण्यात आली. असं वाटतंय की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तसेच आरोपींची ओळखही पटलेली नाही. या घटनेनंतर न्याय मागण्यासाठी पीडिताची जवळची कुणी व्यक्ती तिथे उपस्थित नसल्याने कदाचित पोलिसही फार लक्ष देत नाही आहेत. आता भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे.

अमेरिकेत द्वेषाच्या गोळीची शिकार झालेले अमरनाथ घोष हे कोलकाता येथील रहिवासी होते. ते चेन्नईमध्ये आर्ट टीचर म्हणून काम पाहत होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे कोलकाता येथे झालं होतं. तसेच ते एक प्रसिद्ध भरतनाट्यमन डान्सरही होते. त्यांनी पीएचडीही केली होती. दरम्यान, देवोलिना भट्टाचार्जीने सांगितलं की, अमेरिकेतील त्यांचे काही मित्र अमरनाथ घोष यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करता यावेत म्हणून मृतदेहावर दावा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र याबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. यादरम्यान शिकागोमधील भारताच्या महावाणिज्य दूतावासाने  घोष यांचे नातेवाई आणि मित्र आपेष्टांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच पोलिसांकडून तपासाबाबत अपडेट मिळवत आहोत, असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :IndiaभारतUnited StatesअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी